Resignations of Congress leaders : कोडवते, डॉ. नामदेव उसेंडी नंतर प्रकाश देवतळे आता कुणाचा नंबर ?

Chandrapur-Gadchiroli Dstricts Lok Sabha Election : दिवसागणिक काँग्रेस खिळखिळी होत चालली आहे आणि या घडामोडी भाजप उमेदवारांच्या पथ्थ्यावर पडताना दिसत आहेत. परिणामी काँग्रेस कोमात, तर भाजप जोमात, अशी स्थिती दिसते आहे.
Chandrapur and Gadchiroli Congress
Chandrapur and Gadchiroli CongressSarkarnama

Resignations of Congress leaders : काँग्रेसचे नेते एकत्र राहिले तर काँग्रेसला कुणी पराजित करू शकत नाही, असे नेहमी बोलले जाते. आप-आपसातील मतभेद, भांडणे यामुळेच काँग्रेसची वाताहत झाली. तरीही पक्षामध्ये एकसंघता आणण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली आहे. पण यावर अद्याप पक्षाकडून काही उपाययोजना झाल्याचे आढळले नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते एकापाठोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. ओळीने काँग्रेस सोडलेले तीन नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे खरं तर काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण असायला हवे होते. मात्र स्थिती तशी दिसत नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे नेत पक्ष सोडत असल्याचे सांगितले जाते.

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते व त्यांची पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत ‘तिकीट विकल्या जातात’, असा गंभीर आरोप करून भाजपमध्ये प्रवेश केला. उल्लेखनीय म्हणजे याच काँग्रेस पक्षाकडून डॉ. उसेंडी एक वेळा आमदार राहिलेले आहेत, तर दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविली आहे. काँग्रेसचा राजीनामा दिलेले हे नेते राज्यातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे समर्थक असल्याचे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrapur and Gadchiroli Congress
Chandrapur Lok Sabha Constituency : काँग्रेस लाथाळ्या पडताहेत भाजपच्या पथ्थ्यावर !

काँग्रेसच्या तीन नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपची वाट धरल्यानंतरही गळती थांबलेली नाही. तर कालच चंद्रपूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. येवढे असे काय घडले की, एका पाठोपाठ एक नेते काँग्रेसला सोडत आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व जण भाजपमध्ये गेले. प्रकाश देवतळे यांच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आणखी दोन मोठे नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाल्यास काँग्रेससाठी ते मोठे नुकसान ठरणार आहे.

यानंतर आता कोण काँग्रेस सोडणार, यावर शर्यती लावल्या जात आहेत. आतापर्यंत काँग्रेस सोडून गेलेले सर्व नेते राज्यातील एका बड्या नेत्याचे समर्थक असल्याची माहिती आहे. या सर्वांच्या पाठोपाठ ते बडे नेतेही भाजपमध्ये जाणार असल्याचे सूत्र सांगतात. आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यांतून काँग्रेसची पडझड पाहिल्यास सूत्रांच्या माहितीला बळ मिळते. काँग्रेसचे ते बडे नेते भाजपमध्ये गेल्यास चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांतून काँग्रेस जवळपास रिकामी होणार आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागली आहे. काँग्रेसचा उमेदवार घोषित होण्यापूर्वीच पक्षात अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वीच भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा झाली होती. इकडे काँग्रेसचा उमेदवार घोषित होण्यापूर्वीच मुनगंटीवार प्रचारात फार पुढे निघून गेले होते.

प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केली. त्यानंतर तरी काँग्रेसमधील लाथाळ्या कमी होतील, असे वाटले होते. पण तसे न होता नेत्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले. त्यामुळे दिवसागणिक काँग्रेस खिळखिळी होत चालली आहे आणि हे राजीनामा सत्र भाजप उमेदवारांच्या पथ्थ्यावर पडताना दिसत आहे. परिणामी काँग्रेस कोमात अन् भाजप जोमात, अशी स्थिती दिसते आहे.

Edited By : Atul Mehere

Chandrapur and Gadchiroli Congress
Gadchiroli Lok Sabha Election : ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...’, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com