Gadchiroli Lok Sabha Election : ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...’, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय ?

Dr. Namdev Usendi : दुसऱ्या दिवशी काँग्रेसने चिमूर-गडचिरोली लोकसभेची उमेदवारी डॉ. नामदेव किरसान यांना जाहीर करताच काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसशी फारकत घेतली.
Gadchiroli Lok Sabha E
Gadchiroli Lok Sabha ESarkarnama

Gadchiroli Lok Sabha Election : गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. जिल्ह्याबाहेरील उमेदवारावर पक्षश्रेष्ठीने विश्वास दाखविल्याने उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या दोन काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दोन्हीही नेते पक्षातील बड्या नेत्याचे निकटवर्तीय असल्याने ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...’, असे काँग्रेसच्या बाबतीत बोलले जाऊ लागले आहे.

काँग्रेसचे आदिवासी सेलचे नेते डॉ. नामदेव उसेंडी यांनी काल (ता. 26) सकाळी गडचिरोलीत पदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळी नागपुरात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. यानंतर येत्या आठवडाभरात काँग्रेसचे आणखी काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. पुढील काहीच दिवसांत काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची चिन्हं दिसत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गडचिरोली जिल्हा काँग्रेसला ग्रहण लागले. बंदद्वार असलेली गटबाजी चव्हाट्यावर आली. उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते यांनी आपल्या पत्नीसह मुंबई येथे जाऊन 'कमळ' हाती घेतले. दुसऱ्या दिवशी काँग्रेसने चिमूर-गडचिरोली लोकसभेची उमेदवारी डॉ. नामदेव किरसान यांना जाहीर करताच काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसशी फारकत घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gadchiroli Lok Sabha E
Gadchiroli Lok Sabha Election : काँग्रेसला आपले लोक सांभाळता येत नाहीत, त्याला आम्ही काय करणार?

डॉ. नामदेव उसेंडी यांनी राजीनामा दिला व नाराजी व्यक्त करीत ‘कमळ’ हाती घेतले. तीन दिवसांतच दोन नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राम राम केल्याने पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. डॉ. कोडवते व डॉ. उसेंडी हे दोन्ही नेते काँग्रेसमधील एका वजनदार नेत्याचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामुळे ते नेतेसुद्धा अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.

कोडवते आणि उसेंडी यांना कुणी बळ दिले, हा प्रश्‍न दबक्या आवाजात चर्चिला जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. उसेंडी यांनी राजीनामा दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेतून केली. या वेळी काँग्रेस नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, हसन गिलानी यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते. मात्र, डॉ. उसेंडी हे एकटेच भाजपवासी झाले असले तरी त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावरच काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

बड्या नेत्याच्या निकटवर्तीयांकडून दगाबाजी होत असल्याने पक्षश्रेष्ठींनी खबरदारी घेत आपले लक्ष बड्या नेत्याचाच भूमिकेवर केंद्रित केले आहे. राज्य स्तरावरील एका नेत्याच्या भूमिकेमुळे दुखावलेले गडचिरोली जिल्ह्यातील नेते 'ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...', असे बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी भूकंप तर होणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नाराजी...

उमेदवारीवरून गडचिरोली जिल्हा काँग्रेसमध्ये वाद पेटले असताना जिल्हाध्यक्षांनी घेतलेली भूमिका पक्षाला मारक ठरणार आहे. चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व अहेरी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी आणि गोंदिया जिल्ह्यांतील देवरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

सर्वाधिक मतदार गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने गृहजिल्ह्यातील इच्छुकांना उमेदवारी मिळावी, अशी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, जिल्हाध्यक्षांकडून जिल्ह्याबाहेरील उमेदवार डॉ. किरसान यांचे पारडे जड केल्याने जिल्हावासीयांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या कार्यकर्त्यांची भावना 'ईव्हीएम'मध्ये परावर्तित झाल्यास पक्षाला याची किंमत मोजावी लागेल, यात काही शंका नाही.

Edited By : Atul Mehere

R

Gadchiroli Lok Sabha E
Gadchiroli Lok Sabha Election : ‘ते’ तिकडचे राजे, इकडचा राजा मी आहे; कोण म्हणालं असं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com