मशालीने पुन्हा एकदा इतिहास रचला; BMC निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना बुस्टर!

Andheri by-election News : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मते मिळवली.
Uddhav Thackeray, Rituja Latke
Uddhav Thackeray, Rituja Latkesarkarnama
Published on
Updated on

Andheri by-election News : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मते मिळवली. या निवडणुकीत नोटाला १२ हजार ७७८ मते मिळाली आहेत. तर १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

ऋतुजा लटके यांच्या विजयाने पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पहिला आमदार मशाल चिन्हावर निवडून आणला आहे. मशाल चिन्हावरील हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा आणि बळ देणारा आहे. या विजयाने मुंबईतील जनता शिवसेनेच्या पाठिमागे खंबीरपणे उभी असल्याचा मेसेज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यभरात देतील. आगामी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीच्या दृष्टीने देखील ठाकरेंना या विजयाची मोठी मदत मिळणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Uddhav Thackeray, Rituja Latke
‘अंधेरीतील विजय शिंदे गट-भाजपला चपराक; त्यांची कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत’

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठीमागे नेते गेले असतील मात्र, कार्यकर्ते ठाकरेंच्या बाजूनेच आहेत, असा मेसेजही राज्यभर या विजयामुळे जाऊ शकतो. शिंदे यांच्या बंडानंतर गेली तीन महिने ठाकरेंसाठी मोठा संकटाचा काळ होता. एकएक साथीदार साथ सोडून शिंदेंच्या गटात दाखल होत गेला. रमेश लटके यांच्या निधनाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक झाली. सुरुवातीला भाजपने (BJP) ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती.

अंधेरीत विजयाचा विश्वास भाजप नेत्यांकडून होऊ लागला. मात्र, ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूतीही मोठी होती. दुसरीकडे याच काळात ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष... आणि कम्युनिस्ट पक्षाचाही पाठिंबा मिळाला. काहीही झाले तरी लटके यांना विधानसभेत पाठवायचेच हा चंगच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधला होता. त्यात जनतेचाही ठाकरेंना पाठिंबा मिळाला.

ही जागा लढवली तर पराभूत होण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे अंतर्गत सर्व्हेच सांगत होते, अशी अंतर्गत सूत्रांची माहिती होती. या सगळ्यात भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेतला. तेथेच ऋतुजा लटके (Rituja Latke) यांचा विजय निश्चित झाला. मशाल चिन्हावर शिवसेनेला पहिला आमदार मिळाला होता. तसचे शिवसेनेला पहिला खासदारही मशाल चिन्हावर मिळाला होता. त्यातच मुंबई महापालिकेतील विजय ही मशाल चिन्हावर झाला होता.

Uddhav Thackeray, Rituja Latke
अंधेरीतील विजयाचा जल्लोष साजरा करणार नाही; कारण... : ऋतुजा लटके

त्यामुळे शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्हानेच पहिला विजय दिला आहे. त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरे यांच्यासाठी बुस्टर डोस ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे अगामी मुंबई महापालिकेत या विजयामुळे ठाकरेंचा विश्वास नक्कीच वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com