SAAM-TV-No-2
SAAM-TV-No-2

'साम टीव्‍ही 'न्‍यूज नंबर २ वर पोहचलं; दिग्गज न्‍यूज चॅनल्‍सना वेगाने मागे सारलं

ग्रामीण महाराष्‍ट्रात सर्वाधिक पाहिलं जाणारं न्‍यूज चॅनल म्‍हणून साम टीव्‍हीनं आपलं स्‍थान बळकट केल्‍याचं बार्कच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय . ग्रामीण महाष्ट्रात साम टिव्ही न्यूज २२.३ टक्के पसंती मिळवून नंबर १ झालंय . झी २४ तास २१.७ टक्के घेत दुस-या तर एबीपी माझा २०.७ टक्के मिळवत क्रमांक तीन वर आहे .
Published on

मुंबई : 'सकाळ' माध्‍यम समूहाचा भाग असलेलं 'साम टीव्‍ही न्‍यूज चॅनल' गेले काही महिने वेगानं लोकांच्‍या पसंतीला उतरत आहे. बार्क(BARC) या संस्‍थेच्‍या 24 व्‍या आठवड्याच्‍या रेटिंगनुसार दिग्गज न्‍यूज चॅनल्‍सना मागे सारत साम टीव्‍ही न्‍यूज नंबर २ वर पोहचलंय .

या आठवड्यात 20. 7 टक्‍के प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे यातून महाराष्‍ट्रातल्‍या 15 वर्षांवरील महिला आणि पुरुष प्रेक्षकांमध्‍ये साम टीव्‍ही न्‍यूज लोकप्रिय होत असल्याचं सिध्द झालंय .

साम टीव्‍ही न्‍यूज चॅनल गेले काही महिने सातत्‍यानं आणि वेगानं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतंय . बार्कच्‍या 24 व्‍या आठवड्याच्‍या प्रेक्षकांच्या रेटिंग नुसार झी 24 तास, नेटवर्क 18 लोकमतसारख्‍या प्रस्‍थापित न्‍यूज चॅनल्‍सना मागे टाकण्‍याची किमया साधली आहे.

सर्व न्‍यूज चॅनल्‍सच्‍या बातमीपत्रांमध्‍ये साम टीव्‍ही न्‍यूजचे "टॉप 50 न्‍यूज" आणि "इथे नोकरी मिळेल" हे दोन्ही कार्यक्रम टॉप १०० कार्यक्रमात सर्वोत्‍कृष्ट ठरले आहेत . याशिवाय व्‍हायरल सत्‍य, स्‍पॉटलाइट, सरकारनामा 360, आज काय विशेष, मेगा प्राइम टाईम, ही बातमीपत्रंही विशेष पसंत केली जात आहेत. सामच्या निष्पक्ष बातमीपत्रातूनच ही किमया साधली गेली आहे .

समाजमाध्‍यमांमध्‍ये वाट्टेल त्‍या गोष्‍टी पसरवून सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याच्‍या मानसिकतेला लगाम घालण्‍याच्‍या हेतूनं 'व्हायरल सत्य' हा कार्यक्रम साम टीव्‍हीनं सुरु केला आणि आता या कार्यक्रमातून साम टीव्हीची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झालीय.

युवक , महिला आणि कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी राखून वाहिनीनं नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक समाज निर्मितीला आपल्या कार्यक्रमांमधून प्राधान्य दिलं आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com