Narendra Modi & Sharad Pawar : शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलेले मोदी आता पुण्यात काय नवीन 'गुगली' टाकणार ?

Maharashtra Politics : पवारांनी फोन केल्यामुळेच मोदींनी हा पुरस्काराचं निमंत्रण स्विकारल्याचं बोललं जात आहे.
Sharad Pawar, narendra modi
Sharad Pawar, narendra modisarkarnama
Published on
Updated on

Pune : राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा छत्तीसचा आकडा सगळ्यांनाच ठाऊक आहे. कधी मोदी पवारांचं राजकारण संपवायचा निघाल्याचे जाणवतं तर कधी त्यांच्या राजकीय खेळ्यांचं कौतुकही करतात. निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी आणि पवार हे दोन्हीही नेते आपल्या भात्यातील एकापेक्षा एक सरस टीकेचे बाण एकमेकांवर सोडताना कधीच मागेपुढे पाहत नाही.

पण दोन्ही नेत्यांमध्ये राजकारणापलीकडची वैयक्तिक मैत्री आहे. कधी टीका तर कधी देशाच्या प्रगतीसाठी राजकीय मतभेद बाजूला सारून सल्ला - मसलतही ते करतात. साडेआठ वर्षांपूर्वी 'पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो..' हे मोदींचं विधान राजकीय वर्तुळात चांगलेच गाजले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्विकारण्यासाठी पुण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे. तब्बल साडेआठ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आणि पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे. मोदींनी त्यावेळी पवारांचं बोट धरुन राजकारणात आल्याचे विधान करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र, यानंतर पवारांनी मोदींच्या विधानावर अनेकदा भाष्य करताना कधी हातचं राखून तर कधी झटकून देत सोयीस्कर भूमिका घेतलेलंही लपून राहिलेलं नाही.

Sharad Pawar, narendra modi
Sanjay Raut On Sharad Pawar : मोदींशेजारी बसण्याआधीच संजय राऊतांनी पवारांना 'असे' अडकवले...

साडेआठ वर्षामध्ये पुराखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोदी आणि पवार पुण्यात एकत्र येत असल्यामुळे मोदी पुन्हा पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचा पुनरुच्चार करणार की काहीतरी नवीन एखादी 'गुगली' टाकणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कारण पवारांनी फोन केल्यामुळेच मोदींनी हा पुरस्काराचं निमंत्रण स्विकारल्याचं बोललं जात आहे. मात्र. याचवेळी मणिपूरमधील हिंसाचारावरून राजकारण तापलेलं असताना काँग्रेससह राष्ट्रवादीतील शरद पवार(Sharad Pawar) गट रस्त्यावर उतरत मोदींना काळे झेंडे दाखवणार आहेत. याचवेळी काँग्रेस नेत्यांनी पवारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असंही म्हटलं आहे. पण पवारांनी हे कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sharad Pawar, narendra modi
Anil Bhonde - Rohit Pawar Tweet War : भिडें मागचा बोलविता धनी भाजपच ! रोहित पवारांचे एक घाव दोन तुकडे

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात दंड थोपटले असताना आणि त्याचा प्रमुख चेहरा म्हणून पवारांकडे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोप केल्यानंतर काहीच दिवसांत राष्ट्रवादी(NCP)त उभी फूट पडली असून अजित पवारांचा एक गट थेट सत्तेत सहभागी झाला आहे. मात्र, या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतरही शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहे. यामुळे दोन्ही नेत्यांच्या भूमिकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत.

मोदी त्यावेळी नेमकं काय म्हणाले होते..?

पुण्यात शुगरकेन 'व्हॅल्यू चेन व्हिजन' या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी मोदीं आणि पवारांनी एकमेकांवर अक्षरश: स्तुतीसुमनं उधळली होती. 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून, त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

Sharad Pawar, narendra modi
Ambedkar On Sharad Pawar: शरद पवार महाराष्ट्रापुरते सीमित; आणखी काही राजकीय घडामोडी घडणार; आंबेडकरांचा रोख कोणाकडे?

यावेळी मोदी म्हणाले, "मी वैयक्तिक जीवनात शरद पवारांचा आदर करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. शरद पवार म्हणजे सार्वजनिक जीवनातील एक सर्वसंपन्न व्यक्तिमत्व आहेत. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी मला अगदी बोट धरुन समजावून सांगण्याचीही जबाबदारी पवारांनी पार पाडली. ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्वीकारण्यात मला अभिमानच वाटतो असेही मोदी म्हणाले होते.

'' ते देशासाठी पूर्णपणे समर्पित आणि आपल्या शब्दाला कटिबद्ध...''

तर शरद पवारांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावेळी पवार म्हणाले, "पंतप्रधान मोदी काल जपानमध्ये होते. आज सकाळी ते गोव्यात होते. दुपारी ते बेळगावमध्ये होते आणि आता ते पुण्यात आहेत. मला माहित नाहीत ह्या कार्यक्रमानंतर ते कुठे जाणार आहेत. पण ह्यावरुन आपल्याला दिसतं की, ते देशासाठी पूर्णपणे समर्पित आणि आपल्या शब्दाला कटिबद्ध आहेत अशा शब्दांत मोदींच्या उत्साह आणि ऊर्जेविषयी कौतुकोद्गार काढले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com