शरद पवार,राहुल गांधी नागपुरात येण्याची शक्‍यता

शरद पवार,राहुल गांधी नागपुरात येण्याची शक्‍यता
Published on
Updated on

मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानभवनावर 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविले असल्याचे समजते. जर त्यांनी होकार कळविला तर हे दोन नेते एका व्यासपिठावर येण्याची शक्‍यता आहे. 

अधिवेशनादरम्यान 12 डिसेंबरला हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे देखील या मोर्चात सहभागी होणार असून 
फसलेली कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या यांसह राज्यातील विविध प्रश्न सोडविण्यात सरकार कसे अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप व समाजवादी पक्ष या मोर्चात सहभागी होणार आहेत. शरद पवार यांनी एका वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या राजकीय क्षमतेबाबत शंका घेणारे विधान केले होते. त्यानंतर शरद पवार आणि राहुल गांधी प्रथमच एकत्र येणार असल्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com