सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी प्राप्तीकर विभागाने (Income Tax) गुरुवारी (ता. 7) छापेमारी केली आहे. शुक्रवारीही ही छापेमारी सुरूच आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, असं वक्तव्य केलं आहे.
सोलापूर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले, काल अजित पवारांच्याकडे सरकारी पाहुणे येऊन गेले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधीही मला ईडीची नोटीस आली होती. मी ईडीच्या ऑफिसला गेलो आणि नंतर महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवलं, असं म्हणत पवारांनी भाजपचा उल्लेख न करता टोला लगावला.
दरम्यान, गुरूवारी बारामतीत माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले होते की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने आपण भाजप सरकारशी तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. तसेच भाजप सरकारला हे हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायरची उपमा दिली होती. तसेच या हत्याकांडाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने 11 ऑक्टोबर बंदची हाक दिली आहे. त्याचीच ही प्रतिक्रिया आहे.
उत्तर प्रदेशातील घटनांबाबत मी आणि इतर सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली. त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांची प्रतिक्रीया मी ऐकली. मुलींवर छापे टाकणे ही बाब योग्य नाही. प्राप्तिकर विभागाला अधिकार असला तरी त्याचा वापर करताना काही तारतम्य बाळगण्याची गरज आहे, असंही पवार म्हणाले होते.
कुटुंबातील ज्या व्यक्तींचा व्यवहारांशी संबंध नाही, मुलींवरही छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे, त्यामुळे हा अधिकाराचा गैरवापर किती दिवस मान्य करायचा याचा विचार आता लोकांनीच करायला हवा. काही लोक आरोप करतात आणि त्या नंतर केंद्रीय यंत्रणा कारवाई करायला पुढे येतात, ही बाब सर्वाधिक आक्षेपार्ह आहे, असेही पवार यांनी नमूद केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.