बॅडमिंटन स्पर्धेने आणले दोन राजांना एकत्र

रविवारी (ता.१७) सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस समारंभास संघटनेचे प्रमुख ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांना निमंत्रित केले. काकांवरील तसेच क्रीडा क्षेत्रावरील प्रेम पाहता दोन्ही नेतेआपआपला राजकीय पिंड बाजूला ठेवत रात्री साडे नऊला छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आले. पहिल्यांदा आमदार शिवेंद्रसिंहराजे तर पाच मिनिटांच्या अंतराने खासदार उदयनराजे आले.
बॅडमिंटन स्पर्धेने आणले दोन राजांना एकत्र
Published on
Updated on

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे एकमेकांवर टीकासत्र सुरु आहे. हे इतके टोकाला गेले की अभयसिंहराजे (भाऊसाहेब) महाराज, राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या राजकीय कार्यापासून खुडुक कोंबडी, नागोबा, खलनायक, प्रेम चोपडा अशी वैयक्तिक टीका- टिपण्णी पर्यंत ही टीका पोहोचली. सध्या दोन्ही नेत्यांमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच भविष्यात दोन्ही नेते एकत्र (मनोमिलन) येणार का या चर्चेला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शनिवारी (ता.१६) पूर्ण विराम दिला होता.

त्यातच रविवारी (ता.१७) सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस समारंभास संघटनेचे प्रमुख ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांना निमंत्रित केले. काकांवरील तसेच क्रीडा क्षेत्रावरील प्रेम पाहता दोन्ही नेते आपआपला राजकीय पिंड बाजूला ठेवत रात्री साडे नऊला छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आले. पहिल्यांदा आमदार शिवेंद्रसिंहराजे तर पाच मिनिटांच्या अंतराने खासदार उदयनराजे आले. बॅडमिंटन कोर्ट वरील सर्व क्रीडा रसिकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. शिवाजीराजे आणि  शिवेंद्रसिंहराजे ज्या ठिकाणी बसले होते तिथे उदयनराजे गेले. शिवेंद्रसिंहराजे उठले, उदयनराजेंनी शिवाजीराजे यांना नमस्कार केला. तिन्ही राजे एकत्र आल्याने अनेकांनी मोबाईलमधून त्यांची छायाचित्र काढली. 

या काळात दोन्ही नेते एकमेकांशी बोलले मात्र नाहीत. मुख्य बक्षीस समारंभात शिवजीराजेंच्या उजव्या बाजूस उदयनराजे तर डाव्या बाजूस शिवेंद्रसिंहराजे बसले. यशस्वी स्पर्धकांना नेते मंडळींनी बक्षीसे दिली. त्यावेळी काकांनीही दोघाना शाब्दिक टोले लगावले. त्यानंतर अनेक स्पर्धकांसोबत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे उभे राहून फोटो काढले. अखेर काकांची परवानगी घेऊन दोन्ही नेते रवाना झाले. बॅडमिंटन कोर्टवरील सर्वाना मात्र राजकारणा पलीकडचे राजे अनुभवयास मिळाले. या घटना घडामोडीचा अंदाज कोणाला नव्हता. मात्र, सोशल मीडियावर आता दोन्ही नेत्यांची छायाचित्र व्हायरल होऊ लागली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com