नारायण राणेंनी दोन्ही मुलांना घरी बसवावे, तब्येतीला आराम पडेल  : विनायक राऊत 

शरद पवार, नारायण राणे यांनी बाळासाहेबांवर टीका केली तर समजू शकते. त्यांना तो अधिकार आहे. पण मिसरूट न फुटलेल्या मुलाने आरोप करावेत, म्हणजे काय ? -विनायक राऊत
Narayan Rane & Sons
Narayan Rane & Sons

रत्नागिरी:   " नारायण राणे घरच्या दुक्कलीला कंटाळले आहेत. त्यांच्या तब्बेतीला चांगला आराम पडो, अशी भगवतांकडे प्रार्थना करतो. नवस देखील करायला मी तयार आहे. दोन मुलांना घरी बसवा, तब्बेतीला आराम पडेल," अशा  शब्दात  खासदार विनायक राऊत यांनी राणे परिवारावर हल्ला चढवला . 

रत्नागिरी तालुक्‍यातील हरचेरी जिल्हा परिषद गटाच्या निर्धार मेळाव्यात विनायक राऊत बोलत होते . काहींनी शिमग्यातील नौटंकी सुरू केली आहे. या भडभुंज्याच्या टीकेने वाहून जाणारी शिवसेना नाही. नाठाळांना सरळ करण्याचे काम शिवसेना करेल, अशा शब्दात नीलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार खासदार विनायक राऊत यांनी घेतला.

 ते म्हणाले, " वाटदमधील शिवसैनिकांनी मेळावा घेऊन चौकार मारला होता. झापडेकर तुम्ही आज षटकार मारला. तुमचे कौतुक करतो. शिवसैनिक लेचापेचा नसतो. शरद पवार, नारायण राणे यांनी बाळासाहेबांवर टीका केली तर समजू शकते. त्यांना तो अधिकार आहे. पण मिसरूट न फुटलेल्या मुलाने आरोप करावेत, म्हणजे काय, बाळासाहेबांच्या विरोधात बोलण्याचे धाडस ज्यांनी केले त्यांचा सत्यानाश झाला आहे. या वेळी नीलेश राणेचे डिपॉझिटच जप्त होणार आहे."

" सेना हा एक परिवार आहे. एका माळेत गुंतलेले मणी आहोत आणि स्वाभिमानचा परिवार बघा. एका घरात तीन पक्ष. एक भाजपचे सदस्य, एक कॉंग्रेसचा आमदार आणि हे वात्रट कुठे ते बघा. एक ना धड भाराभर चिंध्या. ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी सेनेवर टीका करावी. हिंमत असेल तर शाखाप्रमुखाशी तोडीस तोड सभा घेऊन दाखवा. सामंतांचे काम पाहून तळतळाट होतो. नारळ फोडायला मिळत नाही म्हणून स्वाभिमानचा थयथयाट सुरू आहे."

या वेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, विलास चाळके, राजेंद्र महाडिक, बाबू म्हाप, उद्योजक अण्णा सामंत, महेंद्र झापडेकर, देवयानी झापडेकर, वेदा फडके, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com