सोमय्यांनी आरोप करायचे आणि अस्लम शेख- मोहित कंबोज यांनी गळ्यात गळे घालायचे!

अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्याविरोधात एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
Aslam Sheikh-Mohit Kambhoj
Aslam Sheikh-Mohit Kambhojsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काॅंग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर काल रात्री गेल्याने खळबळ उडाली. त्यांनी केवळ फडणवीस यांची भेटच घेतली नाही तर फडणवीस यांचे विश्वासू मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गळ्यात गळा घालून फोटोसेशनही केले. नंतर कंबोज आणि शेख हे दोेघे एकाच गाडीत बसून नंतर बाहेर पडले. आमच्या दोघांचा दोस्ताना आहे, असे त्यांनी थेट पत्रकारांनाही सांगितले.

एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षांतील नेत्यांना मैत्री असणे काही नवीन नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच शेख यांच्यावर भाजपचे दुसरे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. शेख यांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांची ईडी चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर शेख हे फडणवीस यांना भेटतात आणि त्या वेळी कंबोज तेथे उपस्थित असतात, या विलक्षण योगायोगाची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Aslam Sheikh-Mohit Kambhoj
Sindhudurg ZP : राणे समर्थक गोट्या सावंत, संजना सावंत यांना फटका

शेख यांच्याकडे बंदरे विभाग होता आणि तेव्हाच त्यांनी घोटाळा केल्याचा सोमय्या यांचा दावा आहे. अस्लम भाई क्या कर सकते हैं, समंदर मे फिल्म स्टुडिओ बना सकते हैं, असा नारा किरीट यांनी हे आरोप करताना दिला होता. मालवणी- मड भागात २८ फिल्म स्टुडिओ उभारले गेले. सीआरझेड झोनमध्ये यातील पाच स्टुडिओ आहेत. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवण्यात आली असल्याचे किरीट यांचे म्हणणे होते. कांदळवनाची कत्तल करून हे स्टुडिओ उभरण्यात आल्याचा त्यांचा दावा होता. पर्यावरण मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र तेथे अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने १० लाख स्कवेअर फूट जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत कोस्टल रोड विभागाला पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Aslam Sheikh-Mohit Kambhoj
Sanjay Raut यांच्यावर ईडीचा मोठा आरोप : प्रवीण राऊत यांच्याच पैशावर परदेश दौरे

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून दोघांकडूनही चौकशीचे आश्वासन मिळाल्याचेही सोमय्या यांनी छाती ठोकून सांगितले होते. आगामी काळात अजून काही पुरावे सादर करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते. हे सारे व्हायच्या आधीच शेख हे भाजपच्या नेत्यांना भेटल्याने सोमय्या हे या आरोपांचा आता पुढे पाठपुरावा करणार का, याची आता उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com