चंद्रपूर जिल्हा परिषदेत सुधीर मुनगंटीवारांना शह देण्याचा डाव 

भाजपच्या काही सदस्यांचा गट करून आपल्या मर्जीतील अध्यक्ष व्हावा, यासाठी मुनगंटीवार यांच्यावरदबाव आणण्याची प्रयत्न सुरू आहे. त्या नुअषंगाने काही बैठक सुद्धा पार पडल्याची माहिती आहे.
Some BJP Leaders Trying to Give Checkmate to Sudhir Mungantiwar in Chandrapur
Some BJP Leaders Trying to Give Checkmate to Sudhir Mungantiwar in Chandrapur
Published on
Updated on

चंद्रपूर : पक्षातीलच एका नेत्याने काही जिल्हा परिषद सदस्यांना हाताशी धरून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. वेगळ्या मार्गाने जाणा-या नेत्याने नुकताच या सदस्यांचे स्नेहभोजन घडवून आणले. त्यांच्यासमोर पर्यटन आणि मुद्रास्त्राचा प्रस्ताव ठेवला. अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम राहील, हे निर्विवाद आहे. मात्र अशा भोजनावळींच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनाच शह देण्याचा प्रयत्न होत आहे. 

आता भोजनावळीची कीर्ती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचली. त्यामुळे जेवणाला उपस्थित सदस्यांमध्ये या भानगडीत पडायलाच नको होते, अशी खंत व्यक्त होत आहे.  अध्यक्षपद महिला (सर्वसाधारण)साठी राखीव आहेत. जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६, तर काँग्रेसचे २० सदस्य आहेत. भाजपमध्ये अध्यक्ष होण्यासाठी अनेक नावांची चर्चा आहे. मात्र अंतिम शब्द आमदार मुनगंटीवार यांचाच चालेलं, हे निर्विवाद आहे. परंतु, मुनगंटीवार यांनाच शह देण्याची खेळी आता उघडकीस आली आहे. 

भाजपच्या काही सदस्यांचा गट करून आपल्या मर्जीतील अध्यक्ष व्हावा, यासाठी मुनगंटीवार यांच्यावर दबाव आणण्याची प्रयत्न सुरू आहे. त्या नुअषंगाने काही बैठक सुद्धा पार पडल्याची माहिती आहे. पुढची रणनीती ठरविण्यासाठी १५ डिसेंबरला ब्रह्मपुरी तालुक्यात एक शेतात स्नेहभोजनासाठी भाजपच्या काही निवडक जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रण देण्यात आले. ज्यांना आमंत्रण मिळाले. ते तिथे पोहचले. जवळपास १४ सदस्य बैठकीला उपस्थित होते. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्रातील एका महिला सदस्याचे नाव अध्यक्षपदासाठी समोर केले. पाठिंबा देण्यासाठी गोवा आणि मुद्रा दर्शन देण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र, यातील काही सदस्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही. अध्यक्षपदासाठी जो उमेदवार दिला जाईल. त्याच्या पाठीशी राहणार असे सांगून जेवणावळीतून काढता पाय घेतला. 

दरम्यान, या बैठकीची माहिती आमदार मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना मिळाली. उपस्थित सदस्यांकडूनच दूरध्वनी करून विचारणा केली. बैठकीतील चर्चेचा तपशील जाणून घेतला. दरम्यान, बैठकीचे बिंग फुटल्याने बैठक बोलविणा-या आणि जाणा-या सर्वच सदस्यांना चांगलाच घाम फुटला आहे. 

पक्ष संघटनेच्या बैठकीकडे पाठ

सोमवारी निळकंठराव बुरडकर सभागृहात भारतीय जनता पक्षाची पक्ष संघटन बैठक पार पडली. अधिवेशन असतानाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीला उपस्थित होते. महत्त्वाची असलेल्या या बैठकीला भाजपचे जिल्हा परिषदेतील काही सदस्यांनी दांडी मारली होती. हेच सदस्य ब्रह्मपुरीतील बैठकीला उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com