

सांगली : अनिकेत कोथळे याच्या पोलिस कोठडीतील मृत्यू आणि त्यानंतरच्या क्रौर्याला जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठच जबाबदार आहेत हे मी सप्रमाण सिद्ध करू शकतो, असे आव्हान आज निवृत्त पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोग, माहिती अधिकार समिती, आधार फाऊंडशन आदी संस्थांनी परिसंवाद आयोजित केला होता. "कुंपणच शेत खाते तेव्हा....' असा विषय होता. "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी, सुरेखा कांबळे, सुनील दणाणे आदी उपस्थित होते.
श्री. खोपडे म्हणाले,""समाज प्रतिक्रियावादी आहे. कोथळेसारख्या हत्या घडतात कशा याची योग्य कारणमीमांसा होत नाही. पोलिस यंत्रणेतील वरिष्ठांचे वर्तन नेहमीच कातडीबचाऊ असते. कोथळे प्रकरणाच्या घटनाक्रमाचे निरीक्षण केले तर यात जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठच जबाबदार आहेत हे माझ्या 35 वर्षांतील पोलिस सेवेच्या अनुभवाआधारे सप्रमाण सिद्ध करू शकतो.''
ते म्हणाले,"पोलिसच नव्हे तर सर्व प्रशासकीय व्यवस्था कालबाह्य झाल्या आहेत. बदलांचीच गरज आहे. त्यासाठी जानेवारी 2015 मध्ये आमच्या संघटनेने राज्य सरकारला प्रशासकीय बदलाबाबतचा आराखडा सादर केला आहे. सरकार बदलत नाही म्हणूनच चळवळीचा लोकांचा दबाव हवा. त्यासाठीची वेळ मात्र येत आहे.''
ऍड. वर्षा देशपांडे म्हणाल्या,""कोथळे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत लढत देत राहू.''
श्री. जोशी म्हणाले,""यंत्रणेवर सामान्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी प्रश्न विचारणारी मानसिकता घडवली पाहिजे. समाजातून आवाज उठवणे तितकेच गरजेचे आहे.''
शाहीन शेख यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा कांबळे यांनी पोलिस दलाच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. नीलेश मोहिते, सचिन मोरे, अनिल मांगले, सुधीर शहा, सिद्धाप्पा खांडेकर, मारुती देवकर, विनोद मोरे यांनी संयोजन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.