Suryakanta Patil Join NCP : आधी केसाने गळा कापल्याचा आरोप, आता शरद पवारांच्या नेतृत्वावरच विश्वास...

Suryakanta Patil Join Sharad Pawar Group NCP : 2014 मध्ये अचानक सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ज्या पक्षाच्या विरोधात सर्वाधिक काळ राजकारण केले त्याच पक्षात सूर्यकांता पाटील गेल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.
Sharad Pawar, Suryakanta Patil
Sharad Pawar, Suryakanta PatilSarkarnama

Nanded News, 25 June : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमधील मोठा बहुजन चेहरा अन् मातब्बर नेता गळाला लागल्याने भाजप श्रेष्ठींच्या आनंदला उधाण आले होते. पण अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अवघ्या तीन महिन्यात जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

आधी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत पाटील यांनी आपली दुसरी राजकीय इनिंग सुरू केली होती. पण 2014 मध्ये अचानक सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ज्या पक्षाच्या विरोधात सर्वाधिक काळ राजकारण केले त्याच पक्षात सूर्यकांता पाटील गेल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. पण विचारधारा आणि नवीन लोकांमध्ये त्या रमत नव्हत्या.

सहा वर्ष भाजपमध्ये (BJP) असूनही त्यांना एकटे पडल्याची जाणीव वारंवार होत होती. या उद्विगनेतूनच मे 2020 मध्ये सूर्यकांता पाटील यांनी थेट राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणाच आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून करून टाकली. 43 वर्ष राजकारणात सक्रीय असलेल्या पाटील यांनी नव्या लोकांमध्ये मन रमत नाही, असे म्हणत राजकीय संन्यासाची घोषणा केली होती.

Sharad Pawar, Suryakanta Patil
Sandeep Jagtap: "पैशाचं सोंग करता येत नाही..., असं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतांना त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला केसाने गळा कापला, असा आरोप एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मात्र भाजपला रामराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नव्या राजकारणाची तुतारी फुंकली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यात मोठा राजकीय स्पेस निर्माण झाल्याची चर्चा होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी पक्ष फुटीनंतर नांदेडमध्ये नव्याने जम बसवण्याची ही संधी समजली जात होती. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने पक्षामध्ये अंतर्गत खदखद होती हे लोकसभेच्या पराभवाने स्पष्ट झाले आहे. विशेषत: आधीच अडगळीत पडलेल्या सूर्यकांता पाटील यांचे भाजपमधील वजन अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने अजूनच कमी झाले होते.

Sharad Pawar, Suryakanta Patil
Bhaskar Bhagare Politics : राष्ट्रवादीच्या खासदाराने संसदेतही दिली प्रचारातील घोषणा, मात्र फक्त अर्धी!

त्या मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचे शरद पवारांनी हेरले. सुर्यकांता पाटील यांनीही राजकारणात नव्याने जम बसवायचा असेल तर शरद पवारांचे नेतृत्व आणि त्यांच्या राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही हे ओळखले अन् हा योग जुळून आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुर्यकांता पाटील यांच्यासारख्या मोठ्या, अनुभवी महिला नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या पक्षाला निश्चितच फायदा होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेला कल लक्षात आल्याने शरद पवारांनी पुन्हा आपल्या जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

त्या ग्रामविकास मंत्रालय राज्यमंत्री व त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालय राज्यमंत्री होत्या. 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा त्या आमदार झाल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या. 1991, 1998 आणि 2004 असे तीन वेळा त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com