सांगोला (जि. सोलापूर) : मी आज सकाळी अंघोळ करताना भावनिक झालो होतो. सुमारे दहा वर्षांनी मला आज साहेबांचं जवळून दर्शन होणार होतं. हा योग बाबूराव गायकवाड यांनी घडवून आणला होता. त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. काही व्यक्ती अशा असतात, त्यांना पाहिलं तरी जीवनात एक जिद्द, विचारधारा निर्माण होते. आज त्या रुपाने साहेबांचं दर्शन झालं आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. सांगोला तालुक्यातील जनतेच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की, साहेबांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, असे भावूक होत आमदार शहाजी पाटील यांनी पवारांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Talking about Sharad Pawar, Shahajibapu Patil became emotional)
सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबूराव गायकवाड यांचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) बोलत होते. या वेळी माजी आमदार दीपक साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित हेाते.
मी आमदार असताना शरद पवार साहेबांनी एक अख्खा दिवस माझ्यासाठी दिला होता. सांगोला तालुयातील जुनोनीपासून कार्यक्रम सुरू केला आणि चिकमहुदला शेवट केला होता. आपण हेलिकॉप्टरने गेला होता, अजितदादांनी आपल्याला हेलिकॉप्टर पाठवले होते.
आठवडाभराने मी गायकवाड यांच्या घरी गेलो होतो. तर भिंतीवर पवारसाहेबांचे अनेक फोटो होते. भाऊ त्या फोटोकडे दररोज सकाळी बघायचे. परमेश्वराविषयी ज्या भावना आपल्या मनात निर्माण होतात, त्याच भावना काही व्यक्तींविषयी आपल्या मनात निर्माण होत असतात. गायकवाड यांच्या मनात पांडुरंगाविषयी जेवढ्या भावना आहेत, तेवढ्याच भावना पवारसाहेबांविषयी त्यांच्या मनात आहेत. मी सांगतो साहेब, शंभर वर्षे झाल्याशिवाय ते हार मानणार नाहीत, असेही पाटील यांनी नमूद केले. (Political Web Stories)
शहाजीबापू पाटील म्हणाले की, एक अनामिक नातं आहे. तुम्हाला कोणाला माहिती नाही. कदाचित म्हणतो मी साहेब, मी तुमचा मुलगा आहे. सांगोला तालुका आणि बारामतीचं एक अनामिक नातं आहे. ते दैवी आणि भगवंताचं नातं आहे. माणसाचं नातं नाही. श्रीधर स्वामींचा जन्म नीरा नदीकाठी नाझरे येथे झाला. आज जो शिवलिलामृत ग्रंथ वाचला जातोय. त्याचे संपूर्ण भाषेत रुपांतर झाले आहे. श्रीधर स्वामींचा जन्म जरी नाझऱ्यात झाला असला तरी शिवलिलामृत ग्रंथ त्यांनी बारामतीच्या महादेव मंदिरात बसून लिहिला आहे. हे नातं बारामती आणि सांगोल्याचं आहे. म्हणून हे दैवी जिव्हाळे आहेत. (Political Short Videos)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.