Rahul Gandhi News : 'भारत जोडो'नंतर कर्नाटकच्या विजयाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी झळाळी!

Karnataka Assembly Elections : काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठा ऐतिहासिक विजय मिळवला.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama

Karnataka Assembly Elections News : काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठा ऐतिहासिक विजय मिळवला. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वावार या निवडणुकीने एक प्रकारे शिक्कामोर्ताबच केले. यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाल्याचे चित्र आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकची निवडणूक ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात जोरदार प्रचार केला. त्यानंतरही काँग्रेसने (Congress) कर्नाटकात मोठा विजय मिळवून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी दिली. काँग्रेसने 135 चा आकडा सहज पार केला. या विजयाचे श्रेय राहुल गांधींना देण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीपासून काँग्रेस राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. गेल्या 6 महिन्यांत काँग्रेसचा हा दुसरा मोठा विजय आहे. प्रथम हिमाचल प्रदेश आणि नंतर कर्नाटक.

Rahul Gandhi News
Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे मोठे विधान

कर्नाटकात राहुल गांधींची भारत जोड यात्रा 20 विधानसभा मतदारसंघातून गेली होती. त्यापैकी भाजपला फक्त 2 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर काँग्रेसने 15 विधानसभा मतदारसंघ जिंकले. कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यावर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाजप द्वेषाचे राजकारण करते हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्रेम आणि मुद्द्यांच्या राजकारणातून त्यांनी कर्नाटक जिंकले, असे त्यांनी सांगितले. या विजयामुळे काँग्रेसमध्ये आनंदाची लाट उसळल्याचा व्हिडिओ जाही करण्यात आला. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ची छायाचित्रे आहेत.

सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे कर्नाटकच्या विजयाचे मोठे नायक आहेत. मात्र, मरगळलेल्या काँग्रेसला राहुल गाधींच्या भारत जोडो यात्रेने चालायला लावले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी आणि पक्षाविषयी एक विश्वास निर्माण झाला. त्याची परिनीती कर्नाटकच्या विजयात झाली. राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे मजबूत सरकार आहेत. बिहारमध्येही महाआघाडीचे सरकार आहे. आता कर्नाटकात काँग्रेसचे एकहाती सरकार स्थापन होणार आहे. काँग्रेस राहुल गांधींच्या भारत जोडोला यात्रेपासून बदलली आहे.

Rahul Gandhi News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; बीएस येडियुरप्पा म्हणतात...

हिमाचलच्या निवडणुकीतही भाजपने (BJP) 'भारत जोडो' यात्रेची खिल्ली उडवली होती. मात्र, काँग्रेस जिंकली. यात्रेला भाजपने ज्या प्रकारे हलक्यात घेतले, पण ती कमकुवत नव्हती, असे आता कर्नाटच्या विजयाने दिसत आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसला पहिल्यांदाच इतका मोठा विजय आणि स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये कर्नाटकच्या विजयाचा जल्लोष करताना राहुल गांधींना आपला हिरो म्हणण्याचा सूर उमटत आहे, तो पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com