भाजपला मोठा झटका; कॅबिनेट मंत्र्याचा आमदार मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजप आघाडीवर असते.
Yashpal Arya & son Sanjeev Arya Joins congress.
Yashpal Arya & son Sanjeev Arya Joins congress.
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढील वर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी भाजप व काँग्रेससह इतर पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजप आघाडीवर असते. पण उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कॅबिनेट मंत्र्यांने आमदार मुलासह सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजप सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री राहिलेले यशपाल आर्य व त्यांचे पूत्र आमदार संजीव आर्य यांनी भाजपला रामराम ठोकत सकाळीच दिल्ली गाठली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि प्रदेश पभारी देवेंद्र यादव व माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या उपस्थितीत आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आर्य यांनी 2017 मध्ये निवडणुकीआधीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Yashpal Arya & son Sanjeev Arya Joins congress.
आता भाजपमधूनच विरोधी सूर; प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं!

आर्य हे बाजपुर मतदारसंघातील तर संजीव आर्य हे नैनीताल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील काही दिवसांपासून ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. पण ते तडकाफडकी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जातील याची शक्यता कमी होती. पण आर्य यांनी सर्वांनाच धक्का देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. एकाचवेळी दोन आमदारांनी भाजपला रामराम ठोकल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे.

भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कारण यशपाल आर्य हे सहावेळा आमदार राहिले आहे. ते उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्षही होते. त्यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली होती. ते अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्येच होते. त्यांच्या घरवापसीनंतर उत्तराखंडमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले आहे.

दरम्यान, यापूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आमदार राजकुमार व प्रीतम सिंह पवार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अपक्ष आमदार राम सिंह कैडा यांनीही भाजपला साथ दिली आहे. एकीकडे भाजप आपली ताकद वाढवत असताना काँग्रेसने डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यात त्यांना यशही आले असून थेट कॅबिनेट मंत्री गळाला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com