Vijay Shivtare News : धक्का कुणाला, फायदा कुणाचा; विजयबापू 2019 चा बदला घेणार ?

Baramati Lok Sabha Constituency : विधानसभा हरलेल्या बापूंना लोकसभा लढायचे बळ आले कुठून, दिले कोणी? त्यांचा बोलवता धनी कोण?
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Baramati Political News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बारामती मतदारसंघात सोमवारी (ता. 11) मोठा ट्विस्ट आला. आतापर्यंत थोरले पवार विरुद्ध धाकले पवार अशी थेट होऊ घातलेली लढत ही आता तिरंगी होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. यातून शिवतारे 2019 च्या विधानसभेचे उट्टे काढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच आता अचानकच लोकसभेसाठी दंड थोपटण्याचे बळ त्यांच्यात आले कुठून अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Political News)

2019 ला पवारांनी पुरंदरच्या जनतेचा अपमान केला, असा आरोप करत शिवतारेंनी (Vijay Shivtare) बारामतीतून अपक्ष लढण्याचे जाहीर केले. यामागे मोठी रणनीती असून, त्यांचा बोलवता धनी कोण? त्यांना पुढे करून अजितदादांवर कडी करण्याची खेळी कोण करू पाहत आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विजयबापू आणि अजितदादा यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. 2019 मध्ये शिवतारेंना अजित पवारांनी (Ajit Pawar) चॅलेंज देऊन पाडले होते. त्यानंतर हे दोघे कट्टर राजकीय शत्रू झाले. आमदारकीच्या पराभवाचा तो अपमान बापू अद्याप विसरलेले नाहीत. त्याचा बदला शिवतारेंनी यंदा लोकसभेला सांगून घेण्याचे ठरवल्याचे दिसून येत आहे. आता तो खरा ठरतो की नाही, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Vijay Shivtare
Chandrahar Patil Join Shivsena UBT : 'अब की बार चंद्रहार!' सांगलीसाठी ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पाटील उमेदवार

बापूंची घोषणा हवेतच विरणार

गेल्या वर्षी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडीत बंडखोरी होऊन त्याचा फटका त्यांना बसला. त्याचीच पुनरावृत्ती बारामतीत बापू अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यानंतर होण्याची शक्यता आहे. तेथे युतीत बंडखोरी झाली, तर त्याचा फटका तेथे युतीच्या उमेदवारालाच बसणार आहे. दुसरीकडे केंद्रातील सत्ता आणि मोदींच्या (Narendra Modi) पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपला एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे ते बापूंना अपक्ष लढण्यापासून निश्चित रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. परिणामी त्यांची आजची घोषणा आणि गर्जना काही दिवसांतच हवेतच विरणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

दरम्यान, इंदापुरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि पुरंदरमधून विजय शिवतारेंनी युतीकडून त्यांच्या आमदारकीचा शब्द मागितला आहे. यातच शिवतारेंनी लोकसभा लढवण्याची भाषा केली. या वेळी त्यांनी अजित पवारांसह शरद पवारांनाही लक्ष्य केले. अपक्ष म्हणून लढताना त्यांना इंदापूरच्या पाटलांकडून अपेक्षा असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांना ही निवडणूक म्हणावी अशी सोपी नसणार आहे. त्यांच्या पुरंदर या विधानसभेपेक्षा बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघ सहापट मोठे आहे. युतीची ताकद त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. आघाडीच्या उमेदवाराला शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांची मते मिळणार आहेत. त्यामुळे आमदारकीला पराभूत झालेल्या विजयबापूंसमोर अपक्ष लढून खासदारकी मिळवताना कष्टाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Vijay Shivtare
Lalita Patil News : अमळनेर भाजपच्या ललिता पाटील यांनी हाती बांधले 'शिवबंधन'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com