विजयसिंह पंडित आमदार होण्यासाठी तरुणाचे नऊ दिवस देवीसमोर उभारुन उपवास...

विजयसिंह पंडित आमदार होण्यासाठी तरुणाचे नऊ दिवस देवीसमोर उभारुन उपवास...

गेवराई : निष्ठा विकत मिळत नाही आणि आजच्या युगात राहिली नाही असे म्हणतात. पण, आजही आपल्या नेत्यासाठी "वाट्टेल ते' अशी भावना असलेले तरुण आहेत. याचा प्रत्यय गेवराईच्या राजकारणात आहे. विजयसिंह पंडित त्यादृष्टीने नशिबवान आहेत. विजयसिंह पंडित आमदार व्हावेत यासाठी ज्ञानेश्वर वैद्य या तरुणाने नऊ दिवस देवीसमोर उभे राहून उपवास केले. 

विजयसिंह पंडित राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गेवराईच्या मैदानात उतरले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांचा जोरात प्रचारही सुरु आहेत. पण, विजयसिंह पंडित आमदार व्हावेत यासाठी त्यांच्या चाहत्याने नवरात्रातील नऊ दिवस उपवास करुन देवीला विजयसिंह पंडित आमदार व्हावेत असे साकडे घातले. साधारण 17 वर्षांपूर्वी राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर विजयसिंह पंडित यांनी विजयसिंह युवा मंचच्या माध्यमातून तरुणांची फळी एकत्र केली. त्यांनी आतापर्यंत लढविलेल्या एकाही निवडणुकीत त्यांना अपयश आले नाही. 

विशेष म्हणजे एकाच वेळी दोन जिल्हा परिषद गटांतून विजय मिळविण्याचा विक्रमही विजयसिंह पंडित यांनी केला आहे. त्यांच्या विजयाचे गणित हे त्यांच्यामागे असलेली तरुणांची ही फळीच आहे. विजयसिंह पंडितही तरुणांच्या अडचणीत नेहमी सोबत असल्याने ज्ञानेश्वर वैद्यसारख्या निष्ठावंत तरुणांची त्यांना साथ मिळत आहे. आता आपला नेता मैदानात उतरला असून तो आमदार व्हावा यासाठी ज्ञानेश्वरने नवरात्र सुरु होताच गढी येथील जय भवानी देवीला साकडे घातले. रोज सकाळी यायचे आणि दिवसभर देवीसमोर उभा राहयचे आणि रात्री फक्त एकदा फराळ करायचा असा नित्यक्रम मागचे नऊ दिवस सुरु होता. आता ज्ञानेश्वरची निष्ठा आणि देवीचा आशीर्वाद विजयसिंह पंडित यांना विजयापर्यंत नेतो का हे पहावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com