उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) : "पुर्वी मीपण तंबाखू खात होतो. बबनदादा शिंदेही तंबाखू होते. तंबाखूचे दुष्परिणाम बघता आता बबनदादा तंबाखू खात नाहीत आणि मीही तंबाखू खात नाही', अशा शब्दांत माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रबोधन केले. मोहिते पाटील यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थितांत हस्याकल्लोल उडाला.
माढा येथील आधारकार्ड नोंदणी व अद्ययावत कक्षाचे उद्घाटन करण्यासाठी मोहिते पाटील आले होते. यावेळी आमदार बबनराव शिंदे उपस्थित होते.
माढा शहरात उभारण्यात येणाऱ्या पासपोर्ट कार्यलयामुळे माढ्याचा विकास होणार आहे. येथे येणाऱ्या लोकांसाठी चांगल्या हॉटेलची, राहण्याची जेवणाची, पिण्याची, तंबाखू, गुटखा, सिगरेटची सोय करावी लागणार आहे, असे विनोदी भाषेत बोलत मोहिते पाटील म्हणाले की, "पिण्याचे काम बंद करावे, खायचे काम करावे. परंतु तंबाखू खायचे बंद करावे. कारण पुर्वी मीही तंबाखू खात होतो. अन् बबनदादाही खात होते. तंबाखुचे दुषपरिणाम बघता आता बबनदादांनी तंबाखू खायचे बंद केले. मीही खात नाही. आम्ही खात नाही म्हणुन तुम्हाला सांगतोय बंद करा. नाहीतर आम्ही खात असेल तर आम्हाला सांगायचा काय अधिकार?
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.