चिपी विमानतळ परिसरातील `ताज, ओबेरॉय`च्या जागा सरकारने ताब्यात घ्याव्यात !

विमान लॅडिंग व टेकऑफसाठी कोणत्या प्रक्रिया होतात, याची माहिती राज्याचे मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या आणि शासकीय, तसेच मालकीच्या विमानातून प्रवास करणार्‍या नारायण राणेंसारख्या व्यक्तीला माहित नाही, ही दुर्देवाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्यावर व पालकमंत्र्यांवर खुशाल गुन्हे दाखल करून आपल्या अकलेचे तारे तोडावे. -विनायक राऊत, खासदार
चिपी विमानतळ परिसरातील `ताज, ओबेरॉय`च्या जागा सरकारने ताब्यात घ्याव्यात !
Published on
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळाच्या परिसरात देश, विदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी ताज, ओबेरॉय यांना थ्री स्टार, फोर स्टार हाॅटेलसाठी जागा दिल्या होत्या. त्यांच्याकडून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्या जागा ताब्यात घ्याव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे  खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी विमानतळाच्या ठिकाणी घुसखोरी करत विमान लॅडिंग, टेकऑफ केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, असे मत व्यक्त केले होते. 

यावर तळगाव ता. मालवण येथे पत्रकारांशी बोलतानाबोलताना खासदार राऊत म्हणाले, चिपी येथील विमानतळ हे केंद्र, राज्य शासनाचे नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विमानतळावर घुसखोरी करत विमान लॅडिंग, टेकऑफ केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा असे राणेंनी म्हणणे हा त्यांचा वैचारीक दळभद्रीपणा आहे अशी टीका केली. विमान लॅडिंग, टेकऑफसाठी आयआरबीने आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. त्या खोट्या असतील तर विमानचालन विभागाच्या संचालकांनी कारवाई करायला हवी होती. या विमानतळ धावपट्टीच्या दर्जाची यापूर्वीच तपासणी झाली होती. मात्र प्रवासी वाहतूकीसाठीचा परवाना नसल्यानेच 12 सप्टेंबरला आलेल्या विमानातून विशेष महनीय व्यक्ती नव्हत्या. परवाना आणि चाचण्या तसेच परवाना आणि लॅडिंग याचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीचा परवाना मिळण्यासाठी विमानतळाकडे जाणार्‍या लगतच्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच रात्रीच्यावेळचे लॅडिंग असल्याने वीजपुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे. याची कार्यवाही झाल्यानंतरच विमानतळास प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळेल. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com