आक्रित घडलं! इंधनावरील कर कमी करण्यासाठी भाजपनंच केलं आंदोलन

इंधनावरील कर कमी करून मोदी सरकारने नुकताच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
BJP's Protest
BJP's Protest

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel) अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरोधात रान उठवलं होतं. इंधनाचे दर सातत्याने वाढ होत असल्याने महागाईही वाढतच चालली होती. त्यामुळे जनतेच्या मनातील असंतोषही वाढत चालला होता. पण यावेळी भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी दरवाढीचे समर्थन केलं तर काहींनी काँग्रेसकडे बोट दाखविले.

इंधनावरील कर कमी करून मोदी सरकारने नुकताच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपशासित राज्यांनीही लगेचच व्हॅट कमी करून इंधनाचे दर आणखी कमी केले. पण पंजाब वगळता इतर काँग्रेसशासित व इतर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केलेला नाही. यावरून भाजपच्या नेत्यांनी संबंधित राज्य सरकारांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

BJP's Protest
काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या आमदार पुत्रासह दोघांचा भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये तर इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी भाजपने थेट रस्त्यावरून उतरून आंदोलन केले. कोलकाता येथे झालेल्या या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदारही सहभागी झाले होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधनवरील व्हॅट कमी करण्यासाठी आम्ही दबाव टाकू. पोलीस आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही त्यांच्याशी लढू, असं मुजुमदार यांनी म्हटलं.

दरम्यान, या आंदोलनावरून भाजपला सोशल मीडियात ट्रोल केले जाऊ लागले आहे. इंधनाचे दर वाढलेले असताना आंदोलन का केले नाही, असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. अजूनही इंधनाचे दर फार कमी झालेले नाहीत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर शंभरीच्या पुढे आहेत. इंधनावरील कर वाढत असताना त्याला विरोध का केला नाही, असे प्रश्नही केले जात आहेत.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांनी जनतेला कोणताही दिलासा जाहीर केलेला नाही. पश्चिम बंगालनेही विधानसभा निवडणुकीपूर्वीच व्हॅट २ रुपयांनी कमी केला असल्याचे सांगितले आहे. या पलिकडे जावून राजस्थान सरकारने केंद्राच्या अबकारी करानंतर राज्यांचा व्हॅट आपोआप कमी होत असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com