
पुणे : सलग नवव्यांदा निवडणूक लढवत सातव्यांदा विधानसभेची पायरी माजी मंत्री बबनराव पाचपुते चढणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांचा पराभव करत त्यांनी विजयश्री खेचून आणली.
१९८० मध्ये आमदार होणारे पाचपुते आताच्या विधानसभेतील ते एकमेव सदस्य असणार तर आहेतच शिवाय विधानसभेच्या सर्वाधिक निवडणुका लढणारे सदस्यही पाचपुते हेच ठरले आहेत. आजच्या विजयाने त्यांच्या अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.
१९८० साली म्हणजेच ३९ वर्षांपूर्वी पाचपुते 'जायंट किलर' ठरत पहिल्यांदा विधानसभेत दाखल झाले होते. कारखानदार असलेले दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर पाचपुते यांनी सर्वच्या सर्व म्हणजे नऊ विधानसभा निवडणुका लढल्या. त्यात १९९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता ते सातत्याने निवडून येत राहिले.
कमी वयात आमदारीकीची माळ गळ्यात पडल्याने त्यांना सलग नववी निवडणूक लढणे शक्य झाले. शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर १९६२ पासून लढण्याचा विक्रम आहे, जो अजूनही अबाधित असणार आहे. मात्र त्यांनी निवडणुकीच्या आखड्यातून आधीच माघार घेतल्याने ते आताच्या विधानसभेत नसतील.
त्यामुळे पाचपुते हे आताच्या विधानसभेतील 'ज्येष्ठ' सदस्य ठरले आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे हे १९८५ साली, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे १९९०, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार १९९१ साली पहिल्यांदा निवडून आले होते. त्यात १९८० साली निवडून येणारे पाचपुते हे एकमेव ठरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.