
पुणे: "आम्ही तिघे शिराळा तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलो होतो. आमच्यापैकी एकास सभापती करायचे होते, तेव्हा नारायणआबांनी माझ्या नावाला पाठिंबा दिला आणि मी जिल्हा परिषदेचा सभापती झालो. आबा पैलवान होते.त्यांनी कुस्ती मेहनत करून जी शक्ती कमावली त्याचा वापर गरिबांच्या रक्षणासाठी केला. शक्ती सज्जनांचे रक्षण करण्यासाठी असते, हाच आबांचा विचार होता "अशा शब्दांत नारायण नांगरे पाटील यांच्याबद्दल आमदार शिवाजीराव नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नारायण नांगरे पाटील हे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे वडिल. त्यांचे काल निधन झाले.
आमदार नाईक आणि नारायण पाटील हे एकेकाळचे मित्र. दोघेही एकाच वेळी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले. पाटील कोकरूडमधून तर नाईक शिरसीमधून. शिराळा तालुक्याला जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची संधी द्यायची होती तेव्हा नारायण आबांनी नाईक यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचे नाईक सांगतात. नारायण पाटील त्यावेळी शिराळा तालुका पंचायत समितीचे सभापती झाले.
''त्याकाळात वाहने कमी होती. मग आबा सरळ एसटीने शिराळ्याला यायचे. सांगलीला सुद्धा हा तालुक्याचा सभापती एसटीने यायचा. कधी एवढ्या दूरवरून मोटरसायकलीवर यायचे. तालुक्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. लोकांची कामे झाली पाहिजेत म्हणून मान अपमानाची पर्वा न करता हा माणूस सभापतीपदाच्या काळात कार्यरत राहिला. ते आमच्या भागातील नामांकित पैलवान होते. त्यांच्याकडे ताकद होती. पण वाईट वागणाऱ्या माणसाला धडा शिकवण्यासाठी आणि गरीबाच्या रक्षणासाठी ताकद वापरायची असते हे आबांना माहिती होतं. पल्या ताकदीचा गरिबाला आधार आणि दुर्जनाला धाक वाटला पाहिजे. हा त्यांचा विचार होता. त्यांनी मुलांच्यावर चांगले संस्कार केले. त्यांच्या संस्कारातून विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा कर्तबगार अधिकारी घडला."असं नाईक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.