Shiv Sena VS Eknath Shinde Live : शिंदे गटाला दिलासा; 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई नाही...

Shiv Sena VS Eknath Shinde Live सामना पोहोचला सर्वोच्च न्यायालयात
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरांसह गुवाहटीत असेलले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात परत येण्याचा आदेश देण्यात यावा. अनेक मंत्री हे महाराष्ट्राबाहेर असल्याने नागरिकांना सेवा देण्यात अडचण येत आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या नेत्यांना नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे. मात्र ते कार्यालयात येत नसल्याने कामांचा खोळंबा झाल्याचा मु्द्दा यात मांडण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर गुप्ता यांच्या खंडपीठापुढे बाबूराव चंदावार यांनी अॅड असीम सरोदे यांनी ही याचिका सादर केली आहे. 

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून कोलाई जमीन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना चौकशीसाठी बोलविले आहे. परिवहनमंत्री अनिल परब हे ईडी कार्यालायत फेऱ्या मारत असताना आता संजय राऊत यांनाही चौकशीसाठी बोलवून ईडीने शिवसेनेसमोरील अडचणी वाढवल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात संजय राऊत हे शिवसेनेचा बालेकिल्ला आक्रमकपणे लढवत आहेत. ते ईडीच्या चौकशीसाठी गेल्यानंतर शिवसेनेची बाजू सक्षमपणे कोण मांडणार, असा प्रश्न येऊ शकतो. अर्थात ईडीची नोटीस आपल्याला अद्याप मिळाली नसल्याचे राऊत यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितले. राऊत यांची उद्या सभा असल्याने ते हजर होण्यासाठी मुदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

गुवाहाटीत असलेले एकनाथ शिंदे आज ( २७ जून) सायंकाळी मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात एकनाथ शिंदे मुंबईत येतील, असेही सांगण्यात आले आहे. तर दूसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही हालचालींना वेग आला आहे.

मुंबई : संजय राऊत यांना ईडीचे समन्स आल्यानंतर त्यांनीही पलटवार केला आहे. ``मला आताच समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!,``असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. हे ट्विट त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग  केले आहे. याचा अर्थ त्यांनी थेट फडणवीस यांना आव्हान दिल्याचे बोलण्यात येत आहे. राऊत हे शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत असल्याने त्यांच्याविरोधात समन्स बजाविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या समन्सनुसार राऊत यांना उद्या चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. मात्र आपल्या सभा असल्याने या चौकशीसाठी मुदत मागण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे. याशिवाय याबाबतच्या पुढील आणखी बाबी स्पष्ट. केंद्र सरकार, शिवसेनेेचे गटनेते अजय चौधरी यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणखी लांबणार आहे. उपाध्यक्षांना 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी पाठविलेली नोटीशीची मुदत ही आज संपणार होती. या आमदारांनी ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर 11 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही उपाध्यक्षांचे वकिल आर. धवन यांनी दिली. मात्र त्याला शिवसेनेचे वकिल यांनी अभिषेक मनु संघवी आणि शिवसेनेचे वकिल देवदत्त कामत यांनी अशा प्रकारे उपाध्यक्षांची ग्वाही रेकाॅर्डवर घेणे, हे कायदेशीर नसल्याचे सांगितले. हा उपाध्यक्षांच्या कामकाजातील ढवळाढळव ठरेल, असा मुद्दा या दोन वकिलांनी दिला. मात्र धवन यांनी दिलेली ग्वाही मान्य करत न्यायमूर्तींनी 12 जुलै संध्याकाळी साडे पाच पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत वाढवून दिली.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com