Password 
वेब स्टोरीज

महागाईसह आता पासपोर्टचाही वाढणार खर्च!मुलांसाठीच्या शुल्कात झाली इतकी वाढ

केंद्र सरकारने १४ वर्षांनंतर पासपोर्टच्या शुल्कात वाढ केली असून, येत्या १ जुलैपासून नवीन दर लागू होणार आहेत.

Amit Ujagare
Password

1) १ जुलैपासून दर लागू

केंद्र सरकारने १४ वर्षांनंतर पासपोर्टच्या शुल्कात वाढ केली असून, येत्या १ जुलैपासून नवीन दर लागू होणार आहेत.

Password

2) ३६ पानांचा तत्काळ पासपोर्ट

नवीन नियमांनुसार, सामान्य श्रेणीतील ३६ पानांच्या पासपोर्टसाठी आता १, ५०० रुपयांऐवजी २, ५०० रुपये मोजावे लागतील.

Password

3) पासपोर्ट नियमात सुधारणा

तर तत्काळ पासपोर्टसाठी ३, ५०० रुपयांऐवजी ५,००० रुपये शुल्क आकारले जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने ‘पासपोर्ट सुधारणा नियम, २०२६’ अंतर्गत गुरुवारी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

Password

4) १४ वर्षानंतर वाढ

सन २०१२ नंतर प्रथमच दरवाढ करण्यात आली आहे. ६० पानांच्या पासपोर्टसाठी सामान्य श्रेणीत २,००० रुपयांऐवजी ३, ५०० रुपये आणि तत्काळ श्रेणीत ४,००० रुपयांऐवजी ६,००० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Password

5) हरवल्यास किती खर्च?

पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास तो पुन्हा मिळवण्यासाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागतील.

Password

6) ६० पानांचा तत्काळ पासपोर्ट

३६ पानांच्या अशा पासपोर्टसाठी सामान्य श्रेणीत ५,००० रुपये आणि तत्काळसाठी ७, ५०० रुपये, तर ६० पानांच्या पासपोर्टसाठी अनुक्रमे ६,००० आणि ८, ५०० रुपये शुल्क असेल.

Password

7) लहान मुलांसाठी किती?

१८ वर्षांखालील अर्जदारांसाठी ३६ पानांच्या पासपोर्टचे शुल्क सामान्य श्रेणीत १, ७५० रुपये आणि तत्काळसाठी ४,२५० रुपये करण्यात आले आहे.

Password

8) कारण काय?

कर्मचारी वेतन, कार्यालयीन खर्च आणि इतर खर्च वाढल्यानं अर्थात महागाई वाढल्यानं पासपोर्टचे दर वाढवण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT