अमेरिकेतील टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी जगातील गरीबी आणि पैशांसंबंधी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
भविष्यात गरिबी नष्ट होणार असून पैसे वाचवण्याची गरजही पडणार नाही, असं मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क हे जगमान्य व्यक्तीमत्व असल्यानं त्यांच्या विधानाला हलक्यात घेता येत नाही.
X चे गुंतवणूकदार रे डालियो यांच्या एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी ही टिप्पणी केली आहे. डालियो यांनी गुंतवणुकीसंदर्भातील ट्रम्प अकाऊंट योजनेबाबत पोस्ट केली होती.
पोस्टमध्ये लिहलं की, 'ट्रम्प अकाऊंट' तरुणांना यामुळं बेसिक फायनान्शिअल स्कील समजून घेण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. यामुळं बाजार आणि कंपन्या कशा ऑपरेट होतात हे त्यांना समजण्यास मदत मिळेल.
या पोस्टवर उत्तर देताना इलॉन मस्क म्हणतात, "पण भविष्यात गरिबी असणार नाही, यामुळं पैसे वाचवण्याची देखील गरज पडणार नाही. कारण जगभरात सर्वच लोकांना मोठे पगार मिळतील"
पण ही गरिबी कशी नष्ट होणार आणि आपल्या गरजा भागतील असे मोठे पगार लोकांना कसे मिळतील? याचं कारण मात्र मस्क यांनी सांगितलेलं नाही. पण मस्क हे वारंवार AIच्या परिणामांची चर्चा करत असतात.
यापूर्वीही मस्क यांनी 'पैसा ही किंमत नसलेली वस्तू असेल' असं विधान केलं होतं. जर AI, रोबोटिक्स सातत्यानं डेव्हलप होत राहिलं तर पैशाला देखील किंमत राहणार नाही, असं मस्क यांनी वॉशिंग्टन डीसी इथं म्हटलं होतं.
पुढील १० ते २० वर्षात काम करणं ही देखील वैकल्पिक बाब होईल. अर्थात काम करणं हे ऑप्शनल राहिलं जे खेळ खेळणं किवा व्हिडिओ गेम खेळण्यासारखं होईल, असंही मस्क यांनी म्हटलं होतं.