शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक दिग्गज नेते आहेत, ज्यांचा प्रभाव महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशव्यापी आहे.
१२ डिसेंबर १९४० रोजी बारामती इथं जन्मलेले शरद पवार हे उद्या वयाची ८५ वर्षे पूर्ण करणार आहेत, पण तरीही ते राजकीय पटलावर सक्रिय आहेत.
आपल्या राजकीय करिअरमध्ये शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत तसंच केंद्रात संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
भारतीय राजकारणातील एक अत्यंत हुशार राजकारणी म्हणून शरद पवार ओळखले जातात. यामागे त्यांच्यातील काही महत्वाचे गुण जाणून घेऊयात.
सन १९७८ मध्ये ३८ वर्षांचे असताना शरद पवार हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इतक्या कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर कायम आहे.
शरद पवार हे १९६७ पासून भारतीय राजकारणात आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत ५६ वर्षांत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत.
सन १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण दिलं.
सहकार चळवळ आणि शेतकरी विकासाभिमुख निर्णय घेऊन शरद पवारांनी ग्रामीण महाराष्ट्रात मोठा बदल घडवून महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी जागतिक क्रिकेटला आकार दिला.
सन १९९९ मध्ये शरद पवारांना तोंडाच्या कर्करोगाने ग्रासलं, त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या तोंडावर शस्त्रक्रिया झाली. पण तरीही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या आजारावर मात करत आजवर आपल जीवन व्यवस्थितपणे व्यतीत केलं आहे.