जमीन मोजणीतील `उंदरांना` चोक्कलिंगम जाळ्यात पकडणार का?

जमीन मोजणीतील `उंदरांना` चोक्कलिंगम जाळ्यात पकडणार का?
Published on
Updated on

पुणे : भूमि अभिलेख विभागात भूमापक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पुण्यात एक लाख रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका एजंटालाही अटक करण्यात आली आहे. एका आधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी हे काम केल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

हा आधिकारी कोण याचा शोध घेण्यात येईल, असे या विभागाचे संचालक व राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले आहे. भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या या विभागात शेतकऱ्यांना नाडवणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ असून चोक्कलिंगम यांच्यासारख्या स्वच्छ आधिकाऱ्याने लक्ष घातल्यास शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. 

महसूल विभाग सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने भ्रष्टाचाराचे कुरण आहे. मात्र महसूल विभागापेक्षाही ज्यांच्याकडे महत्वाचे काम आहे अशा भूमि अभिलेख विभागाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अडवणूक व शोषण केले जाते. जमीनीच्या बहुतांश वादाचे व त्यातून होणाऱ्या कोर्ट कचेऱ्यांचे मूळ या विभागात आहे. जमीन मोजणी, नकाशे तयार करणे, चतु:सीमा ठरविणे या प्रकारची जमीनीसंबंधी महत्वाची कामे या विभागामार्फत होतात. थोडक्‍यात जमीनीची मालकी ठरविणारा हा विभाग नागरीकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित नसला तरी त्यांच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव टाकणारा विभाग आहे.


या विभागातील भूमापक हा या साऱ्या व्यवस्थेच्या मुळाशी असतो. त्याच्यामार्फतच जमीनीची मोजणी व त्याआधारे पुढील सारे रेकॉर्ड तयार होते. या विभागाने तयार केलेले रेकॉर्ड महसूल विभागाकडे नोंदीसाठी जाते. मात्र हे करताना थोडीशी चूक झाली तरी पिढ्यान पिढ्यांचे भांडण लागते. 

लाच घेताना या विभागातील कर्मचारी सापडला यात तसे विशेष नवे काहीच नाही. मात्र अटक झाल्यानंतर या विभागाचे प्रमुख एस. चोक्कलिंगम यांच्यासारख्या आधिकाऱ्याचे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निश्‍चय केल्याने काही अशा निर्माण झाली आहे. चोक्कलिंगम साहेब आता पुढाकार घ्या आणि सर्वसामान्यांना नाडणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना बाजूला करून तुमचा विभाग स्वच्छ केल्यास सामान्य शेतकरी तुम्हाला आशिर्वादच देईल. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com