अकोल्यात `राष्ट्रवादी'चा मुस्लीम वोट बॅंकवर डोळा 

आगामी विधानसभा निवडणुकीत अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. या मतदारसंघातील सामाजीक समीकरण लक्षात घेता मुस्लीम वोट बॅंक पक्षाने खेचण्यासाठी राष्ट्रवादीने रणनिती आखली आहे. त्यानुषंगानेच अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी माजी उपमहापौर रफिक सिद्धीकी यांची निवड करून राष्ट्रवादीने मोर्चेबांधणणी सुरू केली आहे.
अकोल्यात `राष्ट्रवादी'चा मुस्लीम वोट बॅंकवर डोळा 

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीत अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. या मतदारसंघातील सामाजीक समीकरण लक्षात घेता मुस्लीम वोट बॅंक पक्षाने खेचण्यासाठी राष्ट्रवादीने रणनिती आखली आहे. त्यानुषंगानेच अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी माजी उपमहापौर रफिक सिद्धीकी यांची निवड करून राष्ट्रवादीने मोर्चेबांधणणी सुरू केली आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यावर भर दिला आहे. त्यानुषंगाने पक्षात मोठ्या प्रमाणात फेरबदल करून नव्या दमाच्या नेतृत्वाकडे पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येत आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. त्यावेळी विजय देशमुख यांनी भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांना जोरदार टक्कर दिली होती. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी विजय देशमुख यांनी ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मागच्या निवडणुकीतील मतांची गणिते मांडून हा मतदारसंघावर प्रबळ दावेदारी केली आहे. या मतदारसंघातील सामाजीक समीकरणे पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस मराठा उमेदवार म्हणुन विजय देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीनेच मुस्लीम मते राष्ट्रवादीकडे वळविण्यासाठी माजी उपमहापौर रफिक सिद्धीकी यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने मुस्लीम वोट बॅंक कॅश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com