काँग्रेसचे नेते आघाडीसंदर्भात केवळ गप्पाच करतात : हरिदास भदे

''आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचीत बहुजन आघाडीला बारा जागा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, त्यावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसचे नेते आघाडीसंदर्भात केवळ गप्पाच करतात,'' असा टोला वंचीत बहुजन अाघाडीचे समन्वयक माजी आमदार हरिदास भदे यांनी ‘सरकारनामा’ शी बोलताना लगावला.
काँग्रेसचे नेते आघाडीसंदर्भात केवळ गप्पाच करतात : हरिदास भदे

अकोला : ''आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचीत बहुजन आघाडीला बारा जागा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, त्यावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसचे नेते आघाडीसंदर्भात केवळ गप्पाच करतात,'' असा टोला वंचीत बहुजन अाघाडीचे समन्वयक माजी आमदार हरिदास भदे यांनी ‘सरकारनामा’ शी बोलताना लगावला. 

आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेला पायऊतार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेण्याची रणनिती आखली आहे. आघाडीत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या वंचीत बहुजन आघाडीला सहभागी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र, काँग्रेसकडून केवळ प्रसिद्धी माध्यमामध्येच वंचीत बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे बोलले जात असल्याचे भदे म्हणाले. 

''गेल्या दोन महिन्यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हा लोकसभेच्या 12 जागा देण्याचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिला होता. मात्र, त्यावर काँग्रेसकडून अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसचा जुना अनुभव पाहता त्यांच्या भरवश्यावर बसणे योग्य नसल्यानेच आम्ही लोकसभेच्या 48 मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एमआयएम आमच्यासाेबत असून धनगर, ओबीसी, मुस्लीम, मागासवर्गीयांचे भक्कम पाठबळ वंचीत बहुजन आघाडीला मिळत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीत केंद्र व राज्यात परिवर्तन घडविणार आहोत,'' असे हरिदास भदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com