संग्रामपूर : मतदारसंघाला खारपानपट्ट्याचा असलेला अभिशाप पुसण्याठी दिवसांचे रात्र आणि रात्रीचे दिवस करुन ‘पाणी’ या एकाच विषयाकडे फोकस केल्यामुळे 140 गाव योजना पुर्णत्वास जात आहे. गेल्या काही वर्षांतील संपूर्ण राज्यासह देशभरातील पाण्याची समस्या पाहता जिल्ह्यातही पाणीबाणी हा प्रयोग राबविण्यात येत आहे. यासाठी विविध संस्था, सिनेअभिनेते, अखिल भारतीय जैन संघटना पुढाकार घेत कामाला लागल्या आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 8 ते 45 दिवसाच्या कालावधीत मी पक्ष, पद आणि राजकारणाला महत्त्व न देता स्वत: श्रमदान करणार असल्याचे भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या कृतीने तरुणाचा उत्साह वाढला असुन पाण्याची लोकचळवळ धारदार होणार अाहे.
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात असून, आता पाणी अडवा-पाणी जिरवा यावर भर देण्याची गरज आहे. अनेकदा लोकप्रतिनिधी हे केवळ शासकीय आणि विविध संस्थांच्या कार्यक्रमाला उदघाटन तसेच शुभारंभापुरती हजेरी लावत असतात. परंतु, त्याबाबत पाठपुरावा किंवा कामाबाबत उत्सुकता न दाखविल्यामुळे त्यावेळी केलेल्या घोषणा केवळ हवेतच विरतात. परंतु, आता आमदार डॉ. संजय कुटे यांनी राजकारणाला थोडेसे बाजूला ठेवत 45 दिवस श्रमदान करणार असल्याचा निर्णय घेतला असून, यामुळे युवकांमध्येही एक नवचेतना निर्माण होऊन हजारो युवकांनी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार असून, यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सर्व सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदवित ही स्पर्धा नव्हे तर एक चळवळ उभारुन 'देर आये दुरुस्त आये,' या शायरी अंदाजात समभागी होण्याचे आवाहन केले. जलसंवर्धनाची खरी वेळ आली असून, भविष्यातील पाणी टंचाई आजच संपविण्यासाठी आज बांध बांधणे जरुरी असल्याचे सांगत परिवारासह श्रमदान करणार असल्याचे आमदारांनी सांगितले आहे. गत वर्षी ही आमदार कुटे यांनी सपत्नीक श्रमदान केले होते हे विशेष!
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.