अकाेला शिवसेनेत वाढली धुसफूस 

कधीकाळी अकाेला जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. 'गाव तेथे शाखा अाणि घर तेथे शिवसैनिक', अशी मजबुत संघटनबांधणी जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षातंर्गत कुरघाेडीच्या राजकारणामुळे एकसंघ असलेली शिवसेना सध्या दाेन गटात विभागली गेली अाहे.
अकाेला शिवसेनेत वाढली धुसफूस 

अकाेला : संघटनशक्तीच्या जाेरावर राजकीय मैदान गाजविणारा शिवसेना पक्ष जिल्ह्यात सध्या गटबाजीने पाेखरला जात अाहे. अागामी विधानसभा निवडणुक डाेळ्यासमाेर ठेऊन उडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या काही इच्छुक पदाधिकाऱ्यांनी पक्षात 'एकला चलाे रे' चा कार्यक्रम सुरू केल्याने शिवसेनेत पक्षातंर्गत कुरघाेड्या वाढल्या अाहेत. विशेष म्हणजे गटा-तटाचे हे राजकारण खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दाैऱ्यातही चव्हाट्यावर अाले असून हिच परिस्थिती राहल्यास सेनेला विधानसभेचा गड सर करणे तारेवरची कसरत ठरणार अाहे. 

कधीकाळी अकाेला जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. 'गाव तेथे शाखा अाणि घर तेथे शिवसैनिक', अशी मजबुत संघटनबांधणी जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षातंर्गत कुरघाेडीच्या राजकारणामुळे एकसंघ असलेली शिवसेना सध्या दाेन गटात विभागली गेली अाहे. पश्चिम विदर्भाची सूत्रे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे अाल्यावर त्यांनी पक्ष संघटनेत अनेक फेरबदल केले. जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेत सदस्य असलेल्या शिवसेनेच्या काही सदस्यांच्या कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने कुरघाेड्या वाढल्या. 

जिल्हा परिषदेचे तीन सदस्य बाळापूर, अकाेला पुर्व अाणि मुर्तिजापूर मतदारसंघात इच्छुक असल्याने त्यांनी एकत्र येत सेनेचा कारभार अापल्याच साेयीनुसार चालवायला सुरूवात केली. त्यातुनच जिल्ह्यात सेनेचे एकमेव अामदार असलेले गाेपीकिशन बाजाेरिया अाणि खासदार अरविंद सावंत यांच्यात मानपानाचे नाट्य रंगले. अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना धान्य वाटप कार्यक्रमही सेनेतील गटबाजी उघडीस अाली. खासदार सावंत अाणि अामदार बाजाेरिया यांनी एकमेकांवर ताेफ डागली. त्यामुळे पक्षातंर्गत वातावरण चांगलेच तापले. सेनेच्या नेत्यांचा हा वाद येवढ्यावरच थांबला नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अकाेला दाैऱ्यातही प्रकर्षाने समाेर अाला. सेनेत सुरू असलेली ही धुसफूस पक्षश्रेष्ठींनी अाटाेक्यात न अाणल्यास अागामी विधानसभा निवडणुकीत सेनेला फटका बसण्याची शक्यता अाहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com