Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
ठाणे

Eknath Shinde : देवीचा मंडप शक्तीप्रदर्शनाची जागा नाही : शिंदेंनी ठाकरेंना सुनावले

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी गुरुवारी (२९ सप्टें) ठाण्यातील टेंभी नाका येथे देवीचं दर्शन घेतले. येथे ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. एकप्रकारे हे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन मानले जात होते. आता स्वत: शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली. "देवीचं मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा आहे," असा टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.

शिंदे यांनी काल आपल्या परिवारासह टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. देवीची पूजा करून त्यांच्या हस्ते महाआरती पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. महाआरती पार पडल्यानंर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी सुसंगत भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत, त्यामुळेच राज्यातील लोक, प्रत्येक घटक आमच्या भूमिकेला समर्थन देत आहेत," असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह वाद निवडणूक आयोगाच्या पटलावर गेल्याचा संदर्भ देत शिंदे गटाच्या नेत्या व माजी महापौर मीनाक्षी शिंदें यांनी रश्मी ठाकरेंना लक्ष्य केले आहे. “हे काही शक्तीप्रदर्शन करण्याचं स्थान नाही. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे वेळ दिली आहे. तेव्हा जर शक्तीप्रदर्शन केलं तर ते चालू शकेल. इथे शक्तीप्रदर्शन करून कोणतंही चिन्ह मिळणार नाही. कारण देवीच्या हातात धनुष्यबाण नाहीये, त्रिशूळ आहे. त्यामुळे इथे येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नव्हती”,असं मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT