शिंदे - सरनाईक वादावर शिक्कामोर्तब? ; युवा कार्यकारणीतून पुत्राला डच्चू

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक यांचे पुत्र सर्वेश सरनाईक यांना युवा कार्यकारिणीत स्थान नाही.
Ekanath Shinde
Ekanath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे गटाने युवासेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणीत शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या मुलांना, नातेवाईकांना स्थान देण्यात आलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र सर्वेश सरनाईक यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान न दिल्यामुळे सरनाईक आणि शिंदे यांच्यात रंगलेल्या वादाची चर्चा खरी असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

आज शिंदे गटाच्या मुख्य नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर शिंदे गटाच्या युवा सेनेची राज्य कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे, मराठवाडा भागाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर व अविनाश खापे पाटील तर कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ची जबाबदारी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले व रुपेश पाटील, राम राणे यांच्याकडे देण्यात आले आहे.

Ekanath Shinde
पुणे पोलिसांकडून सर्वात मोठे 'लोन ॲप रॅकेट' उध्वस्त!

पश्चिम महाराष्ट्रची जबाबदारी मंत्री उदय सामंत व शिवाजीराव आढळराव यांनी यांचे निकटवर्तीय किरण साली, सचिन बांगर तर कल्याण भिवंडीसाठी दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक यांच्याकडे आहे. मुंबईची जबाबदारी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि राज कुलकर्णी, आमदार दिलीप लांडे यांचे पुत्र प्रयाग लांडे यांच्याकडे देण्यात आले.

ठाणे, नवी मुंबई व पालघर भागातून नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्वेश सरनाईक यांना मात्र शिंदे गटाच्या युवा सेना कार्यकारणीतून डावलण्यात आले आहे. यामुळे आता सर्वेश सरनाईक नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे.

Ekanath Shinde
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; कॅन्सरशी लढणाऱ्या यामिनी जाधवांना हॉस्पिटलमध्ये जाऊन धीर दिला!

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेत सर्वेश सरनाईक हे सचिव म्हणून कार्यरत होते. मात्र आता शिंदे आणि सरनाईक या दोघांमध्ये खटके उडाल्यामुळे युवा सेना कार्यकारिणीतून सरनाईक यांच्या पुत्रांना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती.आणि आज शिंदे सेनेने युवासेनेचे पदाधिकारी नेमताना सरनाईक पुत्र सूर्वेश यास डावलले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com