Dombivali Election 
ठाणे

KDMC Election: डोंबिवलीत भाजपनं एका मतदाराला वाटले 3000 रुपये! भाजप उमेदवारांच्या पॅम्प्लेटसह पैशाच्या पाकीटांचा व्हिडिओ व्हायरल

KDMC Election: राज्यात २९ महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळं आता मतदारांना भुलवण्याचे प्रकार पाहायला मिळू लागले आहेत.

Amit Ujagare

KDMC Election: राज्यात २९ महानगर पालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. केवळ एकच दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळं आता मतदारांना भुलवण्याचे प्रकार पाहायला मिळू लागले आहेत. डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका मतासाठी पाकिटातून ३००० हजार रुपये वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळं आचारसंहितेचा भंग झाला असून यावर आता निवडणूक आयोग काय कारवाई करतेय हे पाहावं लागणार आहे.

मताची किंमत 3 हजार

डोंबिवलीत भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीन हजार रुपयांची पाकिटं वाटल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला असून याचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत पांढऱ्या पाकिटात पाचशे रुपयांच्या 6 नोटा दिसत असून ज्या महिलांना ही पाकिटं मिळालीत त्यांनीच या पाकिटात किती पैसे आहेत हे दाखवलं. या प्रभागात भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पॅम्लेटमध्ये हे पैशाचं पाकिट मतदारांना वाटण्यात आल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT