Mihir Desai, Sunil Rana Sarkarnama
ठाणे

BJP Yuva Morcha : 'युवा मोर्चा' कामाला लागला; मतदारनोंदणीसाठी इव्हेंटचे फंडे

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान-आचार्य :

Dombivli News : भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली असून मतदारनोंदणीवर पहिला भर दिला आहे. याची जबाबदारी भाजपने युवा मोर्चावर सोपवली असून त्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. मतदार नोंदणीच्यानिमित्ताने थेट मतदारांशी संपर्क येत असल्याने हा एक प्रकारे मत मिळवण्याचा पहिला यशस्वी प्रकार मानला जातो.

'शत प्रतिशत भाजप' हे घोषवाक्य समोर ठेवून भाजप लोकसभा (LokSabha Election) निवडणुकीत उतरला आहे. त्यासाठी मतदारनोंदणीचे मोठे आव्हान असून भाजपने ही जबाबदारी युवा मोर्चावर सोपवली आहे. यात कोकण प्रांतासाठी समन्वयक म्हणून सुनील राणा आणि सहसमन्वयक म्हणून डोंबिवलीकर मिहीर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ ची रणनीती आखली आहे. त्यासाठी मतदारनोंदणी ही महत्त्वाची मोहीम आहे. याची जबाबदारी युवा मोर्चाकडे सोपवून मतदारांना पहिल्या टप्प्यात भाजपकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. १ जानेवारीपासूनच भाजपने मतदारनोंदणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

युवा मोर्चा मतदारनोंदणी करणार. त्यासाठी नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. यासाठी युवा मोर्चाला 'फ्री-हँड' देण्यात आलेला आहे. भाजपची संघटनात्मक बांधणी अतिशय उत्तम असल्यामुळे मतदारनोंदणीकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले आहे. संपूर्ण राज्यात मतदारनोंदणीची जबाबदारी भाजपने युवा मोर्चाकडे दिली आहे. यासाठी नवीन नियुक्त्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नव्या नियुक्त्या, नवी जबाबदारी

पश्चिम महाराष्ट्रात अमृत मारणे समन्वयक आणि सहसमन्वयक निवेदिता एकबोटे आहेत. पश्चिम विदर्भात समन्वयक म्हणून प्रणित सोनी, पूर्व विदर्भात रितेश रहाटे, उत्तर महाराष्ट्रात किरण बोराडे यांच्याकडे समन्वयकपदाची जबाबदारी आहे, तर सहसमन्वयक कुशल भापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्याचे समन्वयक अरुण पाठक आणि सहसमन्वयक युवराज पाटील आहेत.

'युवा संवाद' आणि 'नमो चषक'

संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघानुसार 'युवा संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये तरुणांना एकत्र करून त्यांच्याशी कार्यकुशलता, व्यक्तिमत्त्व विकास यासंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन केले जाणार आहे. तर 'नमो चषक' स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने स्पोर्ट्स आणि कलेसंदर्भातील स्पर्धा घेण्यात येतील, अशी माहिती कोकण विभागाचे युवा मोर्चा सहसमन्वयक मिहीर देसाई यांनी 'सरकारनामा'ला दिली.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT