BJP Politics : गुजरात भाजप नेत्याच्या कन्येचे गिरीश महाजनांना आव्हान ?

Daughter of Gujarat BJP leader : भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या माजी सरपंच...
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : सध्याच्या प्रस्थापित राजकारणामध्ये पुढे यायचे असेल तर राजकीय पार्श्वभूमी अनिवार्य बनली आहे. अशी पार्श्वभूमी असेल तर सामान्य कार्यकर्ता देखील बलाढ्य नेत्याला आव्हान देऊ शकतो. अशीच स्थिती संकटमोचक गिरीश महाजन यांच्याबाबत घडण्याची शक्यता चर्चेत आहे.

गुजरात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते आर. सी. पाटील यांना गुजरात बरोबरच लगतच्या धुळे आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील राजकारणातही रस आहे. नवसारी येथील खासदार असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय अशी पाटील यांची प्रतिमा आहे. पाटील यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे आहे.

Girish Mahajan
Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड, देशाचा तिरंगा ‘हिरवा’ कधी झाला?

खासदार पाटील यांचे धुळे जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांची नातेसंबंध आहेत. काँग्रेस नेते माजी मंत्री रोहिदास पाटील तसेच विविध राजकीय नेत्यांशी नातेसंबंध आहेत. त्याचा राजकीय फायदा दोन्ही कुटुंबाला होत असतो. खासदार आर. सी. पाटील यांची एक कन्या धरती देवरे नुकतीच धुळे (Dhule) जिल्हा परिषदेची बिनविरोध अध्यक्षा बनली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धरती देवरे हिला सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते पहिल्याच टर्ममध्ये त्या थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या आहेत. खासदार पाटील यांची दुसरी कन्या भाविनी हिचे सासर मोहाडी (जामनेर) येथील आहे. सध्या त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. यापूर्वी त्यांचे संपूर्ण पॅनेल निवडून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावेळी त्या पाच वर्ष सरपंच देखील राहील्या आहेत. दुसऱ्या टर्मला त्यांचे पॅनल पराभूत झाले. मात्र त्या स्वतः निवडून आल्या आहेत. जामनेर हा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा मतदारसंघ आहे. महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून त्यांना पक्षाचे संकटमोचक असे देखील संबोधले जाते.

मात्र जामनेर मतदारसंघातील बदलत्या राजकीय परिस्थितीत मंत्री महाजन यांना पर्यायी उमेदवार म्हणून भाजपने आर. सी. पाटील यांची कन्या भाविनी हीचा बहुजन समाजातील युवा चेहरा म्हणून पर्याय विचार होऊ शकतो. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांत तशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे मोठी व प्रभावी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या भाविनी पाटील ग्रामविकास मंत्री महाजन यांना पक्षातून आव्हान ठरतील काय याची चर्चा आहे.

(Edited by Amol Sutar)

Girish Mahajan
Aditya Thackeray: महायुतीनं तारीख जाहीर केल्यानंतर आता आदित्य ठाकरे ॲक्शन मोडवर; कोल्हापुरात..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com