ठाणे

'म्हाडा'प्रकरणी आव्हाडांच्या घरासमोर अभाविपचा राडा ; राष्ट्रवादीही आक्रमक

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ''जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad) राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,'' अशी मागणी करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांनी आज आव्हाडांच्या घरासमोर निदर्शने केली. अभाविपच्या काही कार्यक्रर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP)कार्यक्रर्तेही आता आक्रमक झाले आहेत.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागत शनिवारी मध्यरात्री म्हाडाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थांना मनस्ताप सहन करावा लागला. या परीक्षा गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी म्हाडा, आणि पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा (mhada exam 2021) पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

म्हाडा पेपर फुटीवरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरलं आहे. या परीक्षेवरुन (mhada exam 2021) राजकारण तापलं असताना यात आता संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. ''विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळू नका. जागे व्हा. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, जमत नसेल तर..मंत्रिपद सोडा,'' असे संभाजी बिग्रेडनं (sambhaji briged) म्हटलं आहे.

आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. ''विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तुमचेच लोक पेपर फोडत असतील आणि प्रत्येक पदावर लाखो रुपयांचा बाजार त्या ठिकाणी फुटत असेल याला फक्त मंत्री आणि सरकारच जबाबदार आहेत,''

''तुम्हाला व्यवस्थित परिक्षा घेता येत नसतील. ते व्यवस्थित कंडक्ट करता येत नसेल, तर राजीनामा द्या आणि घरी बसा. तुम्ही फक्त मुंबईचे मंत्री आहात का? विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळू नका. जागे व्हा. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, जमत नसेल तर..मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर बोलणार कोणाला,'' असा टोमणा संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी आव्हाडांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT