म्हाडा पेपरफुटीत मुख्यमंत्री आव्हाड, टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय? भाजपचा सवाल

आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : म्हाडाच्या विविध पदासाठी रविवारपासून होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. ठाकरे सरकारवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारच्या (cm uddhav thackeray) कारभारावर उपाध्ये यांनी टि्वट करीत ताशेरे ओढले आहेत.

आपल्या टि्वटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात, ''आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?”

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागत शनिवारी मध्यरात्री म्हाडाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थांना मनस्ताप सहन करावा लागला. या परीक्षा गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी म्हाडा, आणि पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा (mhada exam 2021) पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

''पेपर पुढे ढकलला का ? पेपर फुटला हे असेल तर मग का त्यांच्यावर कार्यवाही नाही केली तुम्हाला तर आधीच कळलं होत तर मग आधीच cancel करायला पाहिजे मॅडम , आम्ही परिस्थिती नसताना १०००-२००० खर्च करून बस बंद असल्याने औरंगाबादहून आलो. आता कळलं की exam cancel आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पण तसचं झालं. mhada पण तसचं, सरकार काय करणार तो पर्यंत आमची मानसिकता खचत आहे एका exam ला किती वेळेस जावे, अशी आमची परिस्थिती नाही, '' अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांना व्यक्त केली.

CM Uddhav Thackeray
''कसं काय शेलार बरं हाय का ? भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी

आरोग्य विभागाची परीक्षाही ऐनवेळी पुढे ढकलल्याने परीक्षार्थी त्रस्त झाले होते, आता म्हाडाची परीक्षा देखील काही कारणाने पुढे ढकलण्यात आल्याचे शनिवारी मध्यरात्री म्हाडाने पत्र प्रसिद्ध करून उमेदवारांना कळविले, तोपर्यत अनेक विद्यार्थी हे आपल्या गावाहून परीक्षा केंद्रांकडे रवाना झाले होते. प्रवाशात त्यांना ही परीक्षा पुढे ढकलल्याचे कळल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com