ठाणे

Bihar Bhavan: एकीकडं सरकारी दवाखान्यांची दुरावस्था अन् दुसरीकडं 314 कोटींचं 'बिहार भवन'; व्यंगचित्रातून मनसेचा हल्लाबोल

Bihar Bhavan: मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ‘बिहार भवन’ प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राहुल क्षीरसागर

Bihar Bhavan: मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ‘बिहार भवन’ प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यंगचित्राच्या माध्यमातून या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शवला आहे. ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाच्यावतीने 'भवन नाही, संदेश आहे' या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून सरकारच्या धोरणांवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात या व्यंगचित्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या याच जागेत सुमारे अडीच हजार गोदी कामगार गेली बारा वर्षे हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, तीच जमीन बिहार सरकारला बाजारभावापेक्षा कमी दरात देण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे स्थानिक मराठी माणसांमध्ये असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे.

मुंबई आणि आसपासच्या भागात वाढती लोकसंख्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि घरांची टंचाई या समस्या गंभीर होत चालल्या असताना सरकारने स्थानिक नागरिकांच्या गरजांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. अन्यथा अशा निर्णयांमुळे सामाजिक व राजकीय तणाव वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला. सरकारने प्रथम गोदी कामगारांना घरे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच इतर प्रकल्पांचा विचार करावा, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे.

दरम्यान, या व्यंगचित्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून आगामी काळात हा मुद्दा अधिकच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. "मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाच्या जागेवर सुमारे ३१४ कोटी रुपये खर्चून ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय हा स्थानिकांच्या हिताविरोधात असून केवळ बाहेरील मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. मुंबईत आजही सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, निवारा आणि मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असताना अशा प्रकारचे प्रकल्प प्राधान्याने राबवणे अन्यायकारक आहे," असं मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT