Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता; लवकरच निघणार आदेश?

Maratha Reservation: मुंबईत आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण दोन प्रमुख अटीशर्तींनंतर मागे घेण्यात आलं होतं. यांपैकी एक अट म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करणे.
Radhakrishna Vikhe patil-Maratha Reservation News
Radhakrishna Vikhe patil-Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation: मुंबईत आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण दोन प्रमुख अटीशर्तींनंतर मागे घेण्यात आलं होतं. यांपैकी एक अट म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करणे. यांपैकी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजातील ज्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले दिले जात आहेत. त्यानंतर आता दुसरी अट असलेल्या सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचं अधिकृत नोटिफिकेशन लवकरच निघणार असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. कारण मराठा आरक्षण विषय उपसमितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती आहे.

Radhakrishna Vikhe patil-Maratha Reservation News
Akola: काठावरच्या भाजपला शरद पवारांचा पाठिंबा; अकोल्यात सत्तेचा मार्ग मोकळा! महापौर अन् उपमहापौरांच्या नावावरही शिक्कामोर्तब

सातारा गॅझेट लागू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठी समाजाला ज्यांच्या या गॅझेटनुसार कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत. त्यामुळं मनोज जरांगे यांची ही दुसरी मागणीही मान्य होणार असल्याची चिन्ह आहेत. पण सध्या तातडीनं याबाबतचा आदेश किंवा नोटीफिकेशन निघू शकत नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा अडथळा असल्याचं सांगितलं जात आहे. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर तातडीनं सातारा गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय होऊ शकतो.

Radhakrishna Vikhe patil-Maratha Reservation News
Priyanka Gandhi: प्रियांका गांधी दररोज निळी हळद का खातात? मोदींना सांगितले कारण

दरम्यान, अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सातारा गॅझेट लागू करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळं आता जरांगेंच्या आंदोलनाला निर्णायक यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com