BJP Sarkarnama
अकोला

Akola News : छत्रपती संभाजीनगरनंतर अकोल्यातही फाडले अमित शाहांचे बॅनर !

Political News : एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने केंद्रीय गृहमंत्री यांच्या दौऱ्याचे बॅनर फाडल्याचा प्रकार घडला असतानाच दुसरीकडे अकोल्यातही शाह यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

जयेश विनायकराव गावंडे

Bjp News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्रात दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकजवळ आली असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असून आंदोलक आक्रमक झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाने आक्रमक होत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उद्या होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले. तर दुसरीकडे अकोल्यातही अमित शाह यांची हॉटेल जलसा येथे 5 मार्चला बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Akola Political News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या नियोजित हॉटेल जलसा येथे क्लस्टरच्या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत ते विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. अकोल्यातील शिवणी विमानतळापासून ते रिधोरा येथील हॉटेल जलसापर्यंत भाजप नेते अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर भाजपकडून उभारण्यात आले आहेत.

भाजपच्या वतीने अमित शाहाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. रिधोरागावाजवळ असलेल्या हॉटेल जलसा मार्गावर लावण्यात आलेले अमित शहांच्या स्वागताचे बॅनर काही अज्ञातांनी फाडले आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोल्यात नेमकं कुणी आणि का बॅनर फाडले याची माहिती आणि कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांचा तगडा बंदोबस्त !

अमित शाह यांना झेडपल्स सुरक्षा असल्याने पोलीस शाह यांच्या दौऱ्यावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. ज्या मार्गाने अमित शाह (Amit saha) जाणार आहेत. त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिवणी विमानतळापासून तर हॉटेल जलसापर्यंत पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.

अमित शाह यांच्यासह भाजपचे (bjp) राज्यातील महत्वाचे नेतेही या दौऱ्यात असतील त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. रिधोरा गावाजवळ असलेल्या हॉटेल जलसाजवळही पोलिसांनी आतापासूनच बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे एकंदरीतच अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांची कडक सुरक्षा असणार आहे. मात्र, बॅनर फाडल्याच्या प्रकारानंतर पोलिसांनी अज्ञाताचा शोध घेणे सुरू केल्याची माहिती आहे.

SCROLL FOR NEXT