मोठी बातमी ! मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या सभेचे बॅनर फाडले

Political News :मराठा आंदोलकांनी सोमवारी शहरानजीकच्या गावात लावण्यात आलेले अमित शाह यांच्या सभेचे बॅनर फाडत जोरदार घोषणाबाजी केली.
chhatrpati Sambhajinagar news
chhatrpati Sambhajinagar newsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrpati Sambhajinagar News : येत्या काळात लोकसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सर्वच पक्षाकडून प्रचार केला जात आहे. त्यातच मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी सभा होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केले जाऊ देत नाही. त्यामुळे आमच्या गावातदेखील बॅनर लावताना ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी, अन्यथा बॅनर लावू देणार नाही, असे म्हणत मराठा आंदोलकांनी सोमवारी शहरानजीकच्या गावात लावण्यात आलेले अमित शाह यांच्या सभेचे बॅनर फाडत जोरदार घोषणाबाजी केली.

chhatrpati Sambhajinagar news
Vijay Wadettiwar : ‘त्यांची’ ‘गॅरंटी’ काय? वडेट्टीवारांचा मोदींना टोला!

वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात अमित शाह यांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर फाडण्यात आले आहेत. अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. त्यासाठी जिल्हाभरात बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या एकाने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले.

आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी

वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात लावण्यात आलेल्या अमित शाह यांचे बॅनर फाडण्यात आले. या वेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या.'आम्हाला उपोषणाल बसायचं असेल, आंदोलन करायचं असेल, त्यावेळी परवानगी घ्यावी लागते. त्या-त्या कार्यालयाला निवेदन द्यावे लागतात. मग आमच्या गावात जर तुम्हाला बॅनर लावायचा असेल तर तुम्ही आमच्या गावातील ग्रामपंचायतची परवानगी घ्या, असे मराठा आंदोलक म्हणाले. परवानगी घेतली नसेल तर आम्ही तुमचे बॅनर लावू देणार नाही, असेही आंदोलक म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून केला जातोय दावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचादेखील समावेश आहे. त्यामुळे उद्या अमित शाह (Amit shah) हे संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेणार आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर महायुतीत भाजपकडून (Bjp) देखील दावा केला जात आहे. त्यामुळे उद्या होणारी अमित शाह यांची सभा महत्त्वाची समजली जात आहे.

R

chhatrpati Sambhajinagar news
Maratha Reservation : आरक्षणासाठी राज्यभरात पाच हजार उमेदवार रिंगणात

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com