Avadhoot Tatkare
Avadhoot Tatkare sarkarnama
अकोला

Avadhoot Tatkare : ठाकरेंना मोठा धक्का ; माजी आमदार तटकरेंचा आज भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो

रोहा : श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे (Avadhoot Tatkare) हे आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी दहा वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजप प्रवेश करतील, असे भाजप कार्यालयातील सुत्रांनी सांगितले. (Avadhoot Tatkare join BJP)

आमदार अवधूत तटकरे, हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत. रोह्याचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. यामुळे एकेकाळी सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत ओळखले जात होते. त्यांची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरली.

सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा दावा करत अवधूत यांनी काकांनाच आव्हान दिले. तेव्हापासूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते.

अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आलं नाही. 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT