Uddhav Thackeray : हिंमत असेल तर मैदानात या ; ठाकरेंचे शिंदेंना खुलं आव्हान

Uddhav Thackeray : सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य करीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य करीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी केली.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात विविध पक्षातील नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची शिवाजी पार्कसाठी न्यायालयीन लढाई, अंधेरी पोट निवडणुकीत उमेदवार ऋतुजा लटके यांना न्यायालयाकडून मिळालेला दिलासा, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी ठाकरेंनी भुजबळांच्या राजकीय संघर्षांचं कौतुक केलं.

"प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला कोर्टात जावे लागते. हिंमत असेल तर मैदानात या. माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदानही तसे मिळणार नाही. तुम्ही आम्ही एका व्यासपीठावर आमने-सामने येऊ'' असा टोला ठाकरेंनी शिंदे गटाला हाणला.

"स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांचा जुना साथी सोबती आजही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्यासोबत आहे. ते गेले पण येताना राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसही घेऊन आले,"अशी खोचक शब्दात ठाकरेंनी भुजबळांच्या कामाचं कौतुक केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले...

  • भुजबळ आज शिवसेनेत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते.

  • फारूक अब्दुल्ला मला म्हणाले होते की, अजिबात घाबरु नको, बाळासाहेबांसारखे लढ. भुजबळ एक वादळ आहे, त्यासोबतच वादळ निर्माण करणारे शरद पवारही आहेत. वादळ, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे शरद पवार आहे.

  • केवळ नेत्यांना आगे बढो म्हणू नका, घोषणा दिल्यानंतर आम्ही लढू पण मागे कुणीच नाही असे होता कामा नये.

  • भुजबळांनी शिवसेना सोडली तो आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता.

  • मी लढाईच्या क्षणाची वाट बघतोय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com