NCP Against Modi Government
NCP Against Modi Government Sarkarnama
अकोला

राष्ट्रवादी झाली आक्रमक, मोदी सरकारची काढली गाढवावरून धिंड...

मनोज भिवगडे

अकोला : पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, गॅस सिलिंडरच्या दराचा उडालेला भडका यांमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे. दिवसागणिक वाढत्या महागाईने प्रत्येक जण त्रस्त झाला आहे. पण आवाज कुणी उठवत नाहीये. अशात शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुढाकार घेतला असून आज मोदी सरकारची गाढवावरून धिंड काढून आणि बैलगाडी चालवून केंद्र सरकारचा निषेध केला.

महागाई वाढवण्यात मोदी सरकारने आतापर्यंतच्या सर्व सरकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. केंद्र सरकारमधील निर्लज्ज मंत्री म्हणतात की, देशाला कोरोना लस मोफत दिल्यामुळे ही महागाई वाढविली जात आहे. काल भाजपच्या एका प्रदेशाध्यक्षाने तर कळसच केला. म्हणाला की, पेट्रोल जर २०० रुपयांवर गेले, तर आम्ही दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास परवानगी देऊ. अशा निर्लज्ज सरकारकडून आता कुठलीही अपेक्षा नाही. तर येत्या निवडणुकीत या सरकारला खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही. पण तोपर्यंत तरी आम्ही महागाईच्या विरोधात लढा देत राहू, असे आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यामध्ये अकोला राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश संघटक मो. रफिक सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरचे नवनियुक्त युवक महानगराध्यक्ष अजय मते यांनी गांधी रोडवर बैलगाडी चालवून व गाढवावर मोदी सरकार विरोधी बॅनर लावून घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध केला.

या आंदोलनात नगरसेवक फैयाज खान, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, देवानंद ताले, बुढन गाडेकर, अब्दुल अनीस, संदीप तायडे, अविनाश चौहान, भारती निम, अख्तर बेगम, अनीता दिघेकर, पापाचंद्र पवार, योगेश हुमने, शौकत अली शौकत, मोहम्मद फिरोज, अक्षय झटाले, शुभम पिठलोड, ओम सावल, सोनू पठान, मुन्ना पहलवान, बाळू नेरकर, मंगेश इंगळे, जितू वानखडे, नाजिम शेख, शेख नदीम, आकाश इंगळे, संतोष सोनोने, राम कामळे, विवेक सिरसाट, स्वनिल वानखडे, विशाल अढाव, पृथ्वीराज गावंडे, युवराज असोलकर, गोपाल चौहान, राम खुरसाडे, आदींसह अनेक युवक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT