पुण्यात राष्ट्रवादी भाजपला विचारणार 'क्या हुआ तेरा वादा'?

भाजपचे वायदे म्हणजे 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात...' या म्हणीप्रमाणे ठरले आहेत.
राष्ट्रवादी-भाजपा
राष्ट्रवादी-भाजपासरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला त्यांनी निवडणुकीआधी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत. त्यासाठी आम्ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून 'क्या हुवा तेरा वादा' ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपाच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत', अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

राष्ट्रवादी-भाजपा
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी

भाजपच्या वायद्यांची आठवण करुन देणाऱ्या प्रश्नमालिकेविषयी माहिती देताना जगताप म्हणाले, ‘‘ पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे वायदे म्हणजे 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात...' या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. भाजपच्या या 'मुंगेरीलाल'च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे’’.

राष्ट्रवादी-भाजपा
नितीन गडकरींचा सल्ला पुणे पालिका ऐकणार; ...पण बजेटमध्ये बसला तरच

'पुणेकरांना २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आश्वासनांची खैरात केली होती. मोफत बस सेवा, चकाचक आणि खड्डेमुक्त रस्ते, गतीमान प्रशासन अशी मोठी यादी भाजपने पुणेकरांसमोर वाचली होती. पुणेकरांनीही भाजपच्या पारड्यात मते टाकली, मात्र प्रत्यक्षात पुणेकरांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात झाला. त्यामुळे पुणेकर या विश्वासघाताला आगामी निवडणुकीतून उत्तर देतील, हे स्पष्ट आहे', असेही जगताप म्हणाले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com