Suresh Dhas-Dhananjay Deshmukh Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Suresh Dhas : मस्साजोगमध्ये देशमुखांची भेट, फडणवीसांकडे 7 मागण्या; धस विश्वास पुन्हा मिळवणार?

Suresh Dhas Meets Dhananjay Deshmukh : भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Hrishikesh Nalagune

बीड : बीड जिल्ह्यात केवळ अधिक्षक बदलून उपयोग नाही, अतिरिक्त अधिक्षक म्हणून पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा विविध मागण्या भाजप आमदार सुरेश धस यांनी केल्या. मस्साजोग येथे जाऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ आरोपींवर गुन्हा नोंद झाला आहे. पण दहाव्या आरोपीचाही यात सहभाग आहे. नितिन बिक्कड यानेच धनंजय मुंडे यांच्या घरी बैठक बसवली होती. त्यानेच वाशीमधून आरोपींना पळून जाण्यास मदत केली होती. त्यामुळे नितिन बिक्कड यालाही सहआरोपी करावे, अशी मागणी आमदार धस (Suresh Dhas) यांनी यावेळी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी स्थापन झालेल्या एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली.

सुरेश धस विश्वास परत मिळवणार?

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आमदार धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनीच हे प्रकरण सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लावून धरले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून बीड जिल्हा प्रशासनावर या हत्येच्या तपासासाठी दबाव कायम ठेवला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची बातमी बाहेर येताच मोठा गदारोळ झाला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या भेटीची बातमी माध्यमांना दिली होती. साडे चार तास धनंजय मुंडे, धस आणि मी एकत्र होतो, असे बावनकुळे यांनी सांगितले होते. त्यानंतर धस यांनीही या भेटीची कबुली दिली होती. तसेच दोनवेळा भेट झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे धस यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. धस यांनी केलाने गळा कापला अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT