Maharashtra Politics : सुरेश धसांना शरद पवारांच्या शिलेदाराने घेरले; न्यायालयाकडून नोटीस, आमदारकी धोक्यात?

Mahebub Shaikh Challenged BJP MLA Suresh Dhas in Court :विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून सुरेश धस हे उमेदवार होते.या निवडणुकीत धस विजयी झाले होते.
Suresh Dhas Sharad pawar
Suresh Dhas Sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Mahebub Shaikh News : भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार मेहबूब शेख यांनी धस यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना या प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून सुरेश धस हे उमेदवार होते.या निवडणुकीत धस यांना 1 लाख 40 हजार 507 मतं मिळाली. तर, मेहबूब शेख यांना 52 हजार 738 मतं मिळाली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांनी मोठा विजय मिळवला होता.

Suresh Dhas Sharad pawar
Manikrao Kokate : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद धोक्यात? विधानसभा अध्यक्षांनी सांगितले कारवाई कधी करणार

सुरेश धस यांच्या निवडीला शेख यांनी न्यायालयात आव्हान देताना याचिका दाखल केली. या याचिकेत धस यांनी निवडणुकीदरम्यान धार्मिक मुद्यावरून मतं मागितली आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला, असे सांगण्यात आले आहे. तसेच शेख यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे की, कर्मचाऱ्यांनी मागूनही फॉर्म 17 ची प्रत दिली गेली नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेख यांच्या याचिकेची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोग आणि सुरेश धस यांना नोटीस बजावली आहे. यावर 5 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.या सुनावणीत काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Suresh Dhas Sharad pawar
Maharashtra Karnataka conflict : "कर्नाटकात जायचं असेल तर कन्नडच बोलायचं...", म्हणत मराठी ST चालकाच्या तोंडाला फासलं काळं, बसचीही तोडफोड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com