Chandrakant Khaire, Sandipan Bhumre sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Chandrakant Khaire News : देवदर्शन झाले, आता विजयासाठी खैरेंचा यज्ञ..

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha election: लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे विजयी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News  : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर काल एक्झिट पोलचे कल समोर आले. महाराष्ट्रात हे कल महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी दिलासा देणारे आहेत. भाजपचे मिशन-45 या एक्झिट पोलमुळे फेल होताना दिसते आहे. यात लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार चंद्रकांत खैरे हे विजयी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

खैरे यांची लढत महायुतीचे संदीपान भुमरे यांच्याशी आहे. 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी देवदर्शन घेत विजयासाठी साकडे घालायला सुरुवात केली. धार्मिक वृत्तीच्या चंद्रकांत खैरे यांची महादेव, भद्रा मारुती, राजुरेश्वर गणपती या देवांवर श्रद्धा आहे. गेली अनेक वर्ष राजकारणात असूनही न चूकता ते नियमित दर्शन, व्रत, वैकल्य, पूजा, अनुष्ठान, दान-धर्म, जप-तप, यज्ञ करत असतात.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर जिल्ह्यातील, मराठवाड्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देत केवळ स्वतःच्याच नाही, तर राज्यातील महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी साकडे घातले. देवदर्शन झाल्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी आता विजयासाठी यज्ञ सुरू केला आहे. दौलताबाद घाटातील प्रसिद्ध अशा दक्षिमुखी हनुमान मंदीरात सलग आठ तास हा यत्र सुरू आहे.

अकरा ब्रम्हवृंद यासाठी पौराहित्य करणार असून या हवनात समिधा आणि आठ किलो शुद्ध तुपाचा वापर केला जाणार आहे. विरोधकांकडून कायम खैरे यांच्या यज्ञ, होम-हवन याची टिंगल उडवली जाते. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी खैरे यांना उद्देशून यज्ञ केल्याने कोणी निवडून येते का? अशी टीका केली होती.

परंतु याकडे दुर्लक्ष करत खैरे यांनी विजयासाठी यज्ञ सुरू केला आहे. एक्झिट पोलमध्ये अंदाज खैरेंच्या बाजू ने असल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे, आता हा यज्ञ त्यांना विजय मिळवून देतो का? याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT